महाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून तळीयेमधील ३२ घरं त्याखाली गाडली गेली. यामध्ये ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. पण या दुर्घटनेमधून वाचलेले दोन बहिण भाऊ आजही त्या घटनेच्या आठवणीने घाबरतात. आपले मित्र-मैत्रिणी आपल्या समोर मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी पाहिले आहे. आईमुळे आम्ही वाचलो असेही ते सांगतात....आता सरकारने आम्हाला घर उभारुन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या दिवशी नेमके काय घडले हे त्यांच्याकडून जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...