महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला एकीकडे सुरुवात केली असताना, दुसरीकडे पुण्यातील रिक्षाचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. अनधिकृत बाईक, टॅक्सी प्रमाण पुण्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रिक्षाचालकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. बाईक,टॅक्सी अनधिकृत असल्याचे शासनाने वारंवार सांगून सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. अनेक फायनान्स कंपन्या वसुलीसाठी धमकावतात. दोन वर्ष मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अशात महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
आम्ही जगायचं की नाही ?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ज्या सरकारला रिक्षाची उपमा देण्यात आली होती या सरकारने आमची निराशा केल्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आलं. एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आहे. याचा आनंद होता मात्र त्यांनी सुद्धा आमची निराशा केली आहे. आमचे बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदार असेल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज्यकर्त्यांना त्यांच्या जागा दाखवून देणार असल्याचं रिक्षा चालक यांनी सांगितला आहे.रिक्षा चालकांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी