महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे आपली संस्कृती.... संस्कृती म्हटल्यानंतर सण-उत्सव आलेच... या उत्सवांमध्ये संगीत, गाणे, वाद्य यांना प्रचंड महत्त्व आहे. मात्र कुठलाही कार्यक्रम हा साऊंड सिस्टिम शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. साऊंड सिस्टिम हाताळणारी व्यक्ती पडद्यामागचा हिरो असते. पण हीच साऊंड सिस्टीम सांभाळण्याचे काम अमरावती जिल्ह्यातील दोव दृष्टीहीन तरुण करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंधांसाठीच्या विद्यालयामधील अक्षय महल्ले व संकेत सहारे या दृष्टी बाधित तांत्रिक सहाय्यकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...