आदित्य ठाकरे समोर महिलांनी मांडली गाण्यातून पाणी टंचाईची व्यथा

सध्या तापमानाचा पारा 42 ते 44 डिग्री असून त्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे होरपळून निघत आहे. त्याच सोबत महाराष्ट्रात पाणी टंचाईची समस्या भीषण होत असून, काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहापूर-कसारा परिसरातील पाणी टंचाई ग्रस्त आदिवासी पाडयाना भेट देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या यावेळी आदिवासी महिलांनी गाण्यातून पाणी टंचाईची व्यथा मांडली " पाण्यावाचून जगायचं कस " अश्या आशयाचे आदिवासी बोलीचे गाणे देखील सादर झाले, प्रतिनिधी किरण सोनवणेंचा ग्राऊंड रिपोर्ट;

Update: 2022-05-09 12:09 GMT

शहापूर इगतपुरी परिसरात 199 खेड्याना सध्या पाणी टंचाईने घेरले आहे. वास्तविक मुंबई-ठाण्याना मुबलक पाणी देणारी धरणे शहापूर-कसारा परिसरात आहेत. मात्र प्रशासनाच्या नियोजन शून्य काराभारा मुळे हे तालुके तहानलेले आहेत. "मी कल्याणकर" सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी 200 वर्षांपूर्वी बांधली विहीर जी टोपीची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे, तिला पुनर्जीवित करण्याचे काम शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी करीत आहेत.




 


यासाठी गाळण बंधारे बांधले जात असून त्यात जैविक प्रक्रिया जोरात होण्यासाठी लाखो रुपये किमतीच्या बायोसॅनिटायझर चिप या बंधाऱ्यात टाकण्यात येत आहेत.




 


200 वर्ष जुनी विहीर पुनर्जीवित करण्यासाठी यावेळी जलतज्ञ गुणवन्त पाटील देखील उपस्थित होते. आदिवासी समाज जागृत होत असून त्यांना त्यांचे प्रश्न समजू लागले असून एका ग्रामपंचायत सदस्य महिलेने आदित्य ठाकरे समोर रोखठोक भूमिका मांडली, इतकंच नव्हेतर पाणी टंचाई दूर झाली नाही तर पाईप वर उपोषण करण्याचा इशारा देऊन टाकला.




 


यावर आदित्य ठाकरे यांनी कमीत कमी 2 वर्ष ही समस्या दूर होण्यास लागतील असे सांगितले.

Tags:    

Similar News