तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामात शौचालयाच्या टाक्या उघड्या

Update: 2018-10-13 08:12 GMT

पालीयेथीलजि.प शाळा व टॉपवर्थ इंग्लीश मिडीयम स्कुल लगत नवीन तलाठी कार्यालय इमारत बांधणीचे काम सुरु आहे. याठिकाणी बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या पाच ते सहा फुटाच्या टाक्या उघड्याअवस्थेत आहेत. त्यामुळे भोवतालच्या शाळेतील विद्यार्थी पाण्याने भरलेल्या उघड्या व असुरक्षित असलेल्या टाक्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित व बेजाबदाररित्या होत असलेल्या या बांधकामाविरोधात पालीकर नागरीकांसह पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. यापुर्वी सुधागड तालुक्यात परळी येथिल खोल टाकीत पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती होउन भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये याकरीता सबंधीत प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने जलदरित्या योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. पाली तलाठी कार्यालयाच्या होत असलेल्या नवीन इमारत बांधकामाच्या शेजारीच रा.जि.प प्राथमिक शाळा पाली क्र. 1, पाली शाळा क्र. 2, रा.जि.प उर्दु शाळा पाली, तसेच टॉपवर्थ इंग्लीश मिडीयम स्कुल अशा एकुण चार शाळा आहेत. येथील शाळेत परळी, पेडली, जांभुळपाडा, पालीसह तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. के.जी.पासून इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण मिळत असल्याने या शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. याठिकाणी जि.प शाळेतील लहान मुले व टॉपवर्थ शाळेतील लहान मुले शाळेच्या आवारात व परिसरात खेळण्यासाठी येतात. परिणामी डेंग्यू व मलेरियासारख्या आजाराची विद्यार्थी व शिक्षकांना लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने ताबडतोब या शौचालयाचे काम पुर्ण करुन उघड्या व धोकादायक टाक्यांवर झाकण बसविण्यात यावे अशी मागणी करत आहे.

 

Similar News