नालायक माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी तोडफोडच करतो; तनुश्रीचा राज ठाकरेंना टोला

Update: 2018-10-01 14:53 GMT

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवरचे आरोप सत्रातच आज तिने मुंबईतील एका पत्रकार परिषदेत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ती म्हणाली की, "मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही म्हणून राज ठाकरे तोडफोड करतात, आता मला हात लावण्याचा विचारही ते लोक करू शकत नाहीत. तसा विचार त्यांनी केलाच तर ते स्वतःच उद्ध्वस्त होतील," असे वक्तव्य तनुश्रीने यावेळी केले.

तसेच तिने, "नालायक माणूस जेव्हा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो. त्यात राज ठाकरेंनी स्वतःसारख्याच लोकांना पक्षात घेतलं आहे आणि तोडफोड केली जाते," असा टोला देखील यावेळी लगावला.

Similar News