घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकाला सलाईन हातात धरून उभं राहावं लागतं
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट सुरु झालं असताना औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आणखी एक निष्काळजीपणा पुन्हा समोर आला आहे.पचारासाठी आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना सलाईन हातात धरून उभं राहावं लागतं असल्याचे चित्र आहे.;
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वॉर्ड क्र. 15 मध्ये एका रुग्णाला लावलेली सलाईनसाठी स्टँड नसल्याने नातेवाईकाला हातात सलाईन धरून उभं राहावं लागलं.
हे चित्र फक्त वार्ड क्र.15 मध्ये नव्हेच तर अपघात विभागात सुद्धा पाहायला मिळाले. या विभागातून दुसऱ्या वार्डात रुग्णाला नेत असताना हातात सलाईन धरून जावं लागत आहे.
औरंगाबाद मुख्य घाटीत औरंगाबादसह मराठवाड्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र घाटी रुग्णालयात सुविधांचा वणवा पाहायला मिळतोय.
दोन दिवसांपूर्वी पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माश्या घोंगावत अशा अवस्थेत एक व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होता.
यावेळी काही लोकांनी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. डाॅक्टरांनी वेळीच उपचार केला असता तर त्याचं जीव वाचला असता, मात्र येथेही घाटी रुग्णालयाचा निष्काळजीपणा पाहायला मिळालाच.