संतापजनक: तळीये दरडग्रस्थांची नवी घरे निकृष्ट, आ. भरत गोगवलेंनी केली पाहणी

Update: 2023-07-27 08:01 GMT

२०२१ मध्ये तळिये कोंडकर वाडीवर दरड कोसळली. झालेल्या दुर्घटनेत ८७ लोकांचा जीव गेला. यानंतर या गावाच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेली नवी घरे निकृष्ट दर्जाची असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आज या घरांची पाहणी करण्याकरिता आमदार भरत गोगावले यांनी भेट दिली. प्रशासनासोबत आमदार भरत गोगावले यांनी सदर घरांची पाहणी केली. कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर , आमदार भरत गोगावले, जिल्हा अधिकारी योगेश म्हसे, म्हाडाचे प्रांताधिकारी डॉ बानापूरे, तहसिलदार कोकण चे सिईवो, जिल्हापरिषद सिईओ, म्हाडाचे आधिकारी यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत सदर घरांमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून ६६ घरे नागरिकांच्या हवाली करावी असे निर्देश कोकण आयुक्त केंद्र कल्याणकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. तर जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी देखील सीईओ आणि संबंधित अधिकाऱ्यांना येत्या १५ ऑगस्टच्या अगोदर या ठिकाणची सर्व कामे पूर्ण करावीत जोपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांनी ठाण मांडून बसावे असा आदेश दिला.


Full View

Tags:    

Similar News