तनुश्री दत्ताच्या निमित्ताने पुन्हा सुरु झालेल्या #metoo या मोहिमेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. एक पत्रक जाहिर करत राष्ट्रीय महिला आयोगाने या मोहिमेत सहभागी झालेल्या महिलांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार करता यावी यासाठी प्रोत्साहित केले आहे.
त्या बरोबरच या तक्रारी नोंदवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षित वातावरणाची हमी दिली जाते आहे. या तक्ररारी राष्ट्रीय महिला आयोगाकडेही नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे. #metoo मोहिमेत अनेक महिला पत्रकारांनी आपल्यावर बेतलेल्या वाईट प्रसंगाबद्दल सोशल मिडीयात लिहीले आहे त्यामुळे अनेकांची धाबे दणाणली आहेत. या मोहिमेची दखल राज्य महिला आयोगाने मात्र अजुनही घेतलेली नाही.