दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाल्याची घोषणा झाली. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या. यानंतर तरी दिव्यांगांचे मुख्य प्रश्न सुटतील अशी आशा निर्माण झाली. पण अद्याप पर्यंत दिव्यांगांच्या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. दिव्यांग बांधवांचे हे प्रश्न सोडविले न गेल्यास मंत्रालयावर मोठ्या संख्येने धडक देण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी दिव्यांग सेलचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सचिन गायकवाड़ यांनी दीला आहे.
काय आहेत दिव्यांगांच्या मागण्या ?
१)विविध पद भरतीतील प्रवेश फी माफ करण्याची मागणी.
२) ग्रामीण भागात मिळत असलेली कर सवलत शहरी भागातही मिळावी.
३) एकूण कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के दिव्यांग बांधवाना सामावून घेण्याच्या तरतुदीला हरताळ.
४) अधिवेशनात हा प्रश्न मांडून न्याय द्यावा.