पायलनं पहिलं वेतन कृष्ठरोग्यांसाठी दान केलं होतं

Update: 2019-05-30 11:01 GMT

सामाजिक जाणिवा जोपासणाऱ्या डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. डॉ. पायलनं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करतांना मिळालेला पहिला स्टायफंड (शिक्षावेतन) हा वृद्धाश्रम आणि कृष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमाला दान केला होता. यावेळी तिनं या दोन्ही ठिकाणी भरपूर वेळही घालवला. डॉ. रोमिल काकड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवल्याचंही पायलनं आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं होतं. २५ एप्रिल २०१६ रोजी पायलनं ही पोस्ट केली होती. या अनुभवाबद्दल सांगताना पायल खुप उत्साहित आणि आनंदी होती. वृद्धाश्रम आणि कृष्ठरोग्यांच्या आश्रमातून खुप गोष्टी शिकता आल्याचं पायलनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. या दोन्ही ठिकाणची माणसं आहे त्या परिस्थितीत कुणाशीही न भांडता आनंदानं राहतात आणि एकमेकांची काळजीही घेतात. या दोन्ही ठिकाणी आम्ही केलेली मदत हा फार छोटा भाग आहे, मात्र इथल्या लोकांच्या चेहऱ्यावरच समाधान हे त्यापेक्षाही मोठं असल्याचं पायल आपल्या पोस्टमध्ये म्हणते. या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल पायलनं आपल्या बॅचमधल्या सहकाऱ्यांचेही आभार मानले होते.

पाहा त्या वेळची काही छायाचित्र...

Similar News