Tek Fog : भाजपच्या ट्रोल आर्मीचं फेक न्यूज आणि बीभत्स शिवीगाळ करणारे अॅपचा पर्दाफाश
सोशल मीडिया व एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स असणाचे उजव्या विचारसरणीचे भाजपधर्जिने खोटा प्रचार करणारे, ऑनलाइन ट्रोलर्सकडून वापरले जाणारे 'टेक फॉग' या अत्याधुनिक अॅपचा 'द वायर'ने पर्दाफाश केला आहे.;
'टेक फॉग' नावाचे एक अत्याधुनिक व छुपे अॅप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा, स्वत: एक नाराज भाजप कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या, @Aarthisharma08 या निनावी ट्विटर अकाउंटने, एप्रिल २०२० मध्ये ट्विट्सच्या एका मालिकेद्वारे, केला होता. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी, टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील प्रपोगंडा राबवण्याचे ण्याचे उद्दिष्ट या अॅपपुढे आहे, असेही दावा करणाऱ्याने म्हटले आहे.
या ट्विटर हॅण्डलने टेक फॉग या 'छुप्या अॅप'चा उल्लेख केला होता. हे अॅप 'रिकॅप्चा कोड्स बायपास' करून वापरकर्त्यांना 'टेक्स्ट्स व हॅशटॅग ट्रेण्ड्स ऑटो-अपलोड' करण्याची परवानगी देते, असेही म्हटले होते. अशा प्रकारच्या अॅपचा उल्लेख आल्यामुळे 'द वायर'चे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि प्रस्तुत लेखाचे लेखक, या अज्ञात अॅपच्या अस्तित्वाचा तपास करण्याच्या उद्देशाने, ट्विटर अकाउंटमागील व्यक्तीपर्यंत पोहोचले.
त्यानंतर झालेल्या संभाषणांमध्ये, सोर्सने असा दावा केला की, ट्विटरवरील 'ट्रेण्डिंग' विभाग टार्गेटेड हॅशटॅग्जसह अनधिकृतरित्या ताब्यात घेणे, भाजपशी निगडित अनेकविध व्हॉट्सअॅप ग्रुप्स तयार करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे तसेच भाजपवर टीका करणाऱ्या पत्रकारांच्या ऑनलाइन त्रासाचे दिग्दर्शन करणे ही त्याची दररोजची कामे होती. ही सर्व कामे टेक फॉग या अॅपमार्फत केली जात होती.
भाजपने २०१९ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता कायम राखल्यास गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देण्याचा वायदा आपले कथित सूत्रधार देवांग दवे यांनी केला होता. देवांग दवे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय सोशल मीडिया सचिव होते. ते सध्या भाजपचे महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापक आहेत. दवे यांनी मोठ्या पगाराची नोकरी देण्याचा वायदा पूर्ण न केल्यामुळे आपण ही माहिती उघड करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
पुढील दोन वर्षे संभाषणांची प्रक्रिया सुरूच राहिली. या जागल्याने (व्हिसलब्लोअर) केलेल्या आरोपांपैकी कोणत्या बाबींची पडताळणी होऊ शकते आणि कोणत्या बाबींची होऊ शकत नाही याची चाचपणी 'द वायर'ची टीम या काळात करत होती. याशिवाय अशा प्रकारच्या अॅपचा सार्वजनिक संवादावर तसेच देशातील लोकशाहीच्या पावित्र्यावर अधिक व्यापक परिणाम कसा होऊ शकतो याचाही तपास सुरू होता.
यातील प्रत्येक आरोप स्वतंत्र पडताळणीच्या प्रक्रियेद्वारे पडताळून बघण्यात आला. यातून टीमने अॅपच्या वेगवेगळ्या कार्यपध्दती (फंक्शनॅलिटीज), अॅप तयार करणाऱ्यांची ओळख आणि अॅपचा वापर करणाऱ्या संस्था यांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ट्विटर अकाउंटमागील व्यक्तीने एनक्रिप्टेड ईमेल्स आणि ऑनलाइन चॅटरूम्सच्या माध्यमातून अनेक स्क्रीनकास्ट्स आणि स्क्रीनशॉट्स पाठवून, अॅपच्या फीचर्सची प्रात्यक्षिकं दिली. सोर्सनं आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी स्वत:ची व आपल्या एम्प्लॉयर्सची पेस्लिप व बँक स्टेटमेंट्सही शेअर केली (ही कागदपत्रे प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर).
स्रोताने 'द वायर'ला टेक फॉग अॅपला थेट अॅक्सेस दिला नाही. सुरक्षिततेच्या विविध निर्बंधांमुळे हे शक्य नाही असा दावा या व्यक्तीने केला. अॅपच्या डॅशबोर्डवर लॉगइन करण्यासाठी तीन वन-टाइम पासवर्ड्सची (ओटीपी) आवश्यकता असणे तसेच आस्थापना बाहेरच्यांना प्रवेश (अक्सेस) नाकारणारी लोकल फायरवॉल ही त्याची काही उदाहरणे या व्यक्तीने दिली. मात्र भाजयुमो अधिकाऱ्याला पाठवलेल्या ईमेलद्वारे सोर्स आमच्याशी जोडून घेऊ शकत होता. या अधिकाऱ्याने पाठवलेली कोड स्क्रिप्ट्स टीमला विविध बाह्य साधने व सेवांची ओळख पटवण्यात उपयुक्त ठरली. यांद्वारे टेक फॉग अॅप होस्ट करणाऱ्या सर्व्हरला जोडून घेणे शक्य झाले. याच स्क्रिप्टद्वारे, 'द वायर'च्या टीमला हे अॅप होस्ट करणाऱ्या जिओ-रेप्लिकेटेड सर्व्हर्सपैकी एकापर्यंत पोहोचणे शक्य झाले आणि त्यामुळेच हे अॅप प्रसिद्धीच्या वेळीही सक्रिय (फंक्शनल) होते व केवळ प्रोटोटाइप नव्हते, हे स्वतंत्रपणे पडताळून बघणेही शक्य झाले.
स्रोताने पुरवलेल्या प्राथमिक पुराव्याशिवाय, 'द वायर'च्या टीमने अनेक ओपन-सोर्स अन्वेषण तंत्रांचा अवलंब करून, स्रोताने पुरवलेल्या अनेकविध सोशल मीडिया असेट्सचे, विस्तृत फोरेंन्सिक विश्लेषण केले आणि या अॅपच्या वापरासाठी आधारभूत नेटवर्क संरचनेची पडताळणी केली. टीमने आणखी काही स्वतंत्र तज्ज्ञांच्या तसेच या व्यापक ऑपरेशनमध्ये सहभागी कंपन्यांतील सध्याच्या कर्मचाऱ्यांच्याही मुलाखती घेतल्या व त्यायोगे या प्रकरणाच्या आणखी खोलात शिरण्याचा प्रयत्न केला.
या सर्व प्रक्रियेदरम्यान, पुराव्याचे एकत्रिकरण 'द वायर'ला शक्य झाले. त्याचप्रमाणे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत, जनमताचा विपर्यास करण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील घटक एकत्र येऊन, सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील संभाषणे ताब्यात घेऊन व बनावट प्रवाह निर्माण करून कसे व्यापक कुभांड रचू शकतात, हे जनतेपुढे आणण्यातही 'द वायर'ला यश मिळाले आहे.
सोशल मीडियाचा विपर्यास करणाऱ्या अॅपची चार धोकादायक फीचर्स
सोर्ननं पुरवलेल्या, टेक फॉगच्या स्क्रीनकास्ट आणि स्क्रीनशॉट्समधून, अॅपची विविध फीचर्स प्रकाशात आली आणि त्यातून या अॅपचा दररोज वापर करणाऱ्या सायबर फौजांच्या कार्यात्मक रचनेबाबत माहिती मिळवण्यात टीमला मदत झाली. या सायबर फौजा, जनमताचा विपर्यास करणे, वेगळे मत व्यक्त करणाऱ्यांना त्रास देणे आणि भारतात पक्षपाती माहितीचे वातावरण कायमस्वरूपी निर्माण करणे, आदी उद्दिष्टांनी अॅपचा वापर करत असल्याचे यातून पुढे आले.