आश्चर्य ! बीड जिल्ह्यात मृत व्यक्ती झाली जिवंत...
एकदा मृत झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊन तिने काही कृती केली आहे असे जर आपणास कुणी सांगितले तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण बीड जिल्ह्यात तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही असा धक्कादायक प्रकार घडला आहे. काय आहे हा प्रकार प्रत्यक्ष तुम्हीच पहा....;
एकदा मृत झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊन तिने काही कृती केली आहे असे जर आपणास कुणी सांगितले तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण बीड जिल्ह्यात तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही असा धक्कादायक प्रकार घडला आहे. काय आहे हा प्रकार प्रत्यक्ष तुम्हीच पहा....
मृत्यू झाला की माणूस या जगातून निघून जातो. तो पुन्हा कधीही या पृथ्वीतलावर परतू शकत नाही. पण या व्हिडीओत आम्ही जो प्रकार आपणास दाखवणार आहोत तो पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल
भगवान शिरसाट यांचा २२ मार्च २०१७ रोजी मृत्यू झाला. मृत्युनंतर एका वर्षाने त्यांच्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेकनूर शाखेत असणाऱ्या खात्यातील पैसे काढण्यात आले आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर त्यांच्या खात्यातील पैसे कसे काढले असा सवाल त्यांच्या मुलाने केला आहे.
भगवान शिरसाट यांच्या खात्यातून २५ जुलै २०१८ रोजी १२२६० रुपये काढण्यात आले आहेत. ९ मे २०१९ रोजी १३१३२ रुपये काढण्यात आले आहेत. २५ ऑगस्ट २०२२ रोजी ४८ रुपये काढण्यात आले आहेत. त्यांच्या खात्यातून एकूण ७३ हजार ९९२ इतकी रक्कम काढण्यात आली आहे. हा अपहार बँकेतील कर्मचाऱ्यांनीच केला असावा असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.
मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार या घटनेतून उघड झाला आहे. हे पैसे कुणी काढले याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भगवान शिरसाट यांच्या मुलाने केली आहे. नागरिकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्याकडून अशा प्रकारचा प्रकार घडत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.