तसं पत्रकार आणि राजकीय व्यक्ती यांचं बोलणं दररोजच असतं. मात्र, खास वेळ काढून आणि तेही महिला पत्रकारांशी बोलणं हे जर आपसुकच घडतं. किंबहुना तसा योग कमीच येतो. मात्र, पुण्यात असा योग आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी खास महिला पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी महिला पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देत येणा-या काळात आपल्या मतदारसंघातील काय काय प्रश्न असू शकतील? आपल्या समोरील आव्हानांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. सोशल मिडीयावरील ट्रोलींग बाबत विचारणा करताच त्यांनी सोशल मिडीया हे उत्तम साधन असल्याचे सांगत सामान्य नागरिक व नेता यातील अंतर त्यामुळे कमी होण्यास मदत झाली आहे. हे ही त्यांनी यावेळी सांगितले. ट्रोलींगला आपण आपल्याच कार्याची पावती असल्याचं समजत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कुठे आहोत, नक्की काय करतो आहोत याबाबत कार्यकर्त्याना माहिती मिळावी. कुठलाही गैरसमज राहू नये म्हणुन आपण करत असलेल्या फेसबुकच्या लाईव्हची यासाठी बरीच मदत होते असं सांगत सोशल मीडियाचा वापरामुळे सामान्य नागरिक आणि नेते यांच्यातील अंतर कमी झाल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी मारलेल्या गप्पात व्यक्त केलं.