बीड जिल्ह्यातील हार्वेस्टर धारक अडचणीत तीन कोटी वीस लाखच्या मशीन धूळखात...!

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तनासाठी सरकार प्रोत्साहन देत असताना, कधी-कधी आधुनिक तंत्रज्ञानचं शेती आणि शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरू शकते बीड जिल्ह्यातील हार्वेस्टर धारक शेतकऱ्यांच्या दूरावस्थेवरून दिसत आहे.. बीड वरून प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा ग्राउंड रिपोर्ट...;

Update: 2022-01-14 07:46 GMT

 बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी आधुनिक अवजारे खरेदी करत केला त्यामध्ये बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी जॉन डीअर कंपनीचे हार्वेस्टर खरेदी केले यामध्ये हे मशीन खराब असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे गेल्या पाच वर्षात या मशीन च्या खरेदीच्या रकमेपेक्षा दुप्पट खर्च हा दुरुस्तीसाठी लागला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे जॉन डीयर कंपनी या शेतकऱ्यांना आधार देईल का असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.

चार-पाच वर्षांपूर्वी मी हे मशीन विकत घेतलं ते मशीन आम्हाला आज दोन ते अडीच कोटी पर्यंत पडले आणि ज्या वर्षीपासून मशीन घेतले त्या वर्षापासून दुसऱ्या दिवसापासून या मशीनमध्ये प्रॉब्लेम येत आहेत पहिल्या वर्षी किमान 70 ते 80 दिवस मशीन उभा करायल कंपनीने एक वर्ष स्टॅन्ड करून दिल आम्हाला वाटलं प्रॉब्लेम आले आहेत आणि आज कंपनी आमच्या बरोबर आहे पण कंपनी कसल्या प्रकारचा उत्तर देत नाही किंवा आमचा विचार पण करत नाही कसल्याही प्रकारचा रिप्लाय सुद्धा देत नाही इथले डीलर सुद्धा आमचा कसलाच विचार करत नाहीत प्रत्येक वेळेस नवीन निर्माण होते आणि त्यांना प्रॉब्लेम सापडायला किमान सात ते आठ दिवस लागतात त्यांच्याकडे स्पेअर उपलब्ध नाहीत स्पेअर अमेरिकेहून येत असल्यामुळे स्पेअर येण्यासाठी 20 ते 21 दिवस लागतात असे म्हणून सीजनमध्ये दोन-तीन वेळेस मशीन असं बंद राहत दोन-तीन महिने असेच निघून जातात

आम्हाला आता पर्यंत दरवर्षी काम करतो त्याच्या पेक्षा जास्त खर्च स्पेअर व लेबरमध्ये जातो समजा आम्ही सहा हजार टनाचे काम केले सात-आठ लाख रुपया मिळतात आणि त्यापेक्षा जास्त मशीनच्या कामासाठी म्हणजे पंधरा ते सोळा लाख रुपये मशीनच्या कामासाठी खर्च करावा लागला आहे. आणि माझ्या मागे चालणारी यंत्रणा यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे.

प्रत्येक वेळेस मशीन दुरुस्तीसाठी मला दहा ते पंधरा लाख रुपये खर्च येत गेला आणि ह्या मशीन चे हफ्ते आणि हा खर्च करण्यासाठी मी माझी वैयक्तिक सतरा एकर जमीन विकलेली आहे माझ्याजवळ आज फक्त पावणेचार एकर जमीन शिल्लक राहिलेले आहे एवढी जमीन विकून सुद्धा माझ्याकडे कुटुंबाला पोचण्यासाठी काही सुद्धा राहिले नाही मशीन बंद आहे आणि हाताला काम पण नाही अशी परिस्थिती झालेली आहे आमची कंपनीने याच्या मधून आम्हाला आमची मशीन परत घेऊन झालेलं नुकसान आहे अडीच ते तीन कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी एवढीच आमची मागणी आहे...!

अशी अडचण नाही ही कंपनीही मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे आम्हाला आमचे प्रॉब्लेम आहेत ते वरिष्ठांपर्यंत जाऊ शकत नाही पोहोचूच शकत नाहीत त्यांना फोन केला फक्त सांगतात हो आम्ही बघू म्हणून याच्या पलीकडे काही उत्तर नाही किंवा काही नाही कंपनीन जर नाही बघितलं तर आम्हाला कुणाकड बघावं आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही एवढेच माझे म्हणणे आहे की या कंपनीने आणि शासनाने यामध्ये लक्ष घालून आणि या मशीनच्या यामधून बाहेर काढावं...!

मी या अगोदर कंपनीला एक वकिलामार्फत नोटीस पाठवली त्यांनी त्याचे उत्तर पण व्यवस्थित दिलं नाही आणि आता एक महिन्यापूर्वी आम्ही चार तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये या कंपनीचे आठच युनिट आहेत त्यापैकी 4 जणांची ही परिस्थिती आहे आम्ही चौघा जणांनी मिळून एक नोटीस पाठवली आहे त्याचं अजून कंपनीने उत्तर दिलं नाहीये आणि कंपनी कसल्या प्रकारचा विचार करत नाही. धारूरचे शेतकरी जयप्रकाश उत्तम लाल तोष्णीवाल यांनी सांगितले.

दुसरे एक शेतकरी अंगद विश्वंभर गुंदेकर या साडसचिंचोली तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी शेतकरी माणूस आहे मी जॉन डीअर कंपनीचे मशीन चार-पाच वर्षापूर्वी घेतले त्या वेळेस पासून कंपनीचे ह्याला मी वैतागून गेलो आहे यांच्या भरपूर अडचणी आहेत अनेक वेळा त्यांना रिक्वेस्ट केली डीलर ची अरेरावी चालूच आहे कंपनी कुठलेही लक्ष देत नाही यामध्ये आम्ही असे भरडून निघालो आहोत मी एक शेतकरी माणूस आहे मला दुसरा कुठलाही सोर्स नाही शेतीला जोड धंदा म्हणून मी या शुगर केन हार्वेस्टर कडे वळालो आहे जॉन डीअर कंपनी ही नामांकित कंपनी आहे हे एकदम चांगल्या कंपनीचे हार्वेस्टर आहे असे आम्हाला कंपनी वाल्यांनी सांगितले आहे म्हणून आम्ही ते हार्वेस्टर खरेदी केले आहे हार्वेस्टर घेतल्यापासून एवढा त्रास आम्हाला की याची कुठलीच कुठले स्पेअर वेळेवर भेटत नाहीत कुठलाच कंपनीचा आम्हाला सपोर्ट नाही एक वेळेस जर बंद पडला तर आठ दहा दिवस पंधरा पंधरा दिवस शेतात मशीन उभा राहते तिकडं लेबर चा खर्च याच्यातून उरलेलं काहीच नाही आहे ते सांभाळण्यासाठी व बँकेचे हप्ते भरण्यासाठी जमीन विकून हप्ते भरले आहेत.

खरोखरच एवढी बेकार वेळ माझ्यावर आलेली आहे मी मशीन मालक असून माझ्यावर आता ऊस तोडी ची उचल घेऊन मला कारखान्याला जायची वेळ आली आहे एवढा मी वैतागलो आहे की आर्थिक अडचणीत आहे समाजातली पद गेली बँकेतली पद गेली सिबिल माझं खराब झाला आहे बँके वाला मला दारात उभा राहू देत नाही अशी वेळ माझ्यावर आली आहे की कारखान्याला ऊस तोडणी ला जाण्याची वेळ माझ्यावर या मशीनमुळे आले आहे या जॉन डीअर च्या मशीन वर आले आहे माझी मागणी एकच आहे की हे मशीन परत घेऊन आमची झालेली नुकसान भरपाई जेवढे आम्ही यामध्ये लॉस गेलो आहोत तेवढे आमची नुकसानभरपाई कंपनीने द्यावी व मशीन कंपनीने जमा करून घ्यावी अशी माझी कंपनीला विनंती आहे त्याचबरोबर माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत की या कंपनीवर विश्वास ठेवून बसलेल्या आहेत मोठमोठ्या मशनरी घेतले आहेत ट्रॅक्टर्स आहेत हार्वेस्टर आहेत खरेदी केलेले आहेत. 

कमीत कमी या गुंदेकर सारखे असे अजून या कंपनीला बळी पडू नयेत कमीत कमी हे शेतकरी या कंपनीपासून वाचतील पूर्ण महाराष्ट्रातले व शासनाने या कंपनीवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे शासनाने लक्ष देऊन याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे व असे गुंदेकर सारखे व तोषनीवाल सारखे आमच्यासारखे असे बळी गेलेले आहेत असे बळी जाऊ नयेत याच्यात लक्ष घालून शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशीच माझी मागणी आहे व आमच्यासारखे अडकणारे अजून काही शेतकरी आहेत ते तरी अडकणार नाहीत अशी मुख्यमंत्री व शासनाकडे माझी विनंती आहे, असे त्यांनी सांगितले.

जॉन डियर कंपनी प्रतिनिधी अनिज नायर म्हणाले,आमची कंपनी ही शेतकऱ्यांबरोबर काम करणारी कंपनी आहे आमच्या कंपनीचे काम शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच करत असतो तरीपण आमचे जे हार्वेस्टर आहेत हे हार्वेस्टर वेळेवर सर्विसिंग न केल्यामुळे हे खराब होत असतात कारण त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हायड्रोलिक पंप असल्यामुळे त्याचे ऑइल व फिटर सतत बदलावे लागतात जर हे बदलले नाही तर मशीन खराब होते व त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात माझे तोषनीवाल यांच्या बरोबर बोलणे झाले होते पण त्यांनी यावर्षी मशीन दुरुस्त केलेली नाही मशीनच्या स्पेअर पार्ट ची गॅरंटी देऊ व त्यांना येणाऱ्या अडचणी ला नक्कीच आम्ही सपोर्ट करू

आम्ही फक्त शासनाची योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असतो व त्यांना अनुदान कसे मिळेल हे पाहत असतो तुमचे मशीन खराब झाले असेल तर तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बीड यांच्याशी संपर्क करा असा सल्ला साखर आयुक्तालय पुणे येथून दिला आहे.

बीड जिल्ह्यात दिड लाख हेक्‍टर क्षेत्रावर उसाच्या लागवडी...!

जिल्ह्यातील कारखान्यांनी केले ४५ टक्के उसाचे गाळप...!जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पाच कारखाने बंद असल्याने उसाचा प्रश्न ज्वलंत...! बीड जिल्ह्यात ११ साखर कारखाने आहेत त्यामध्ये ४ खाजगी साखर कारखाने आहेत तर सात सहकारी साखर कारखाने आहेत त्यामध्ये दोन सहकारी साखर कारखाने चालू आहेत तर पाच सहकारी साखर कारखाने बंद त्यामध्ये वैद्यनाथ सहकारी कारखाना परळी ,अंबा सहकारी साखर कारखाना आंबेजोगाई ,विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना केज, गजानन सहकारी साखर कारखाना बीड ,कडा सहकारी साखर कारखाना कडा तालुका आष्टी, तर खाजगी साखर कारखाने त्यामध्ये येडेश्वरी शुगर मिल्स केज ,शिवछत्रपती साखर कारखाना माजलगाव ,जय महेश शुगर इंडस्ट्रीज माजलगाव, भीमाशंकर शुगर इंडस्ट्रीज चौसाळा,हे चार कारखाने खाजगी तत्त्वावर चालू आहेत त्याच बरोबर

5 सहकारी साखर कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांना ऊस हा खाजगी कारखान्यावर घालावा लागत आहे त्यामुळे साखर कारखानदारांची मनमानी या ठिकाणी चालते.

बीड जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अतिरिक्त झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी परेशान आहे बीड जिल्ह्यातील जे सहकारी साखर कारखाने आहेत ते नुसते नावाला सहकारी साखर कारखाने आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन ठेवल्या नुसते स्ट्रक्चर उभे केले आहेत ४-2 गाळप करून कारखाने बंद आहेत या कारखान्याचे जे कर्तेधर्ते संचालक मंडळाने आहे यांनी फक्त राजकारणासाठी आणि सहकार्यासाठी कारखाना चा वापर केल्याचे दिसते आज बीड जिल्ह्यातील कडा सहकारी साखर कारखाना असेल गजानन सहकारी साखर कारखाना असेल आंबा सहकारी साखर कारखाना असेल वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना असेल विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना केज हे कारखाने अद्यापही सुरू नाहीत शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचा विचार करता हे कारखाने तात्काळ सुरू करायची गरज आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जो ऊस आहे तो ऊस इतर कारखाने नेण्यास टाळाटाळ करत आहेत आणि जे खाजगी चालू कारखाने आहेत त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ला पाऊस संपत नाही त्यामुळे आज उसाचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे सरकारने व साखर आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, शेतकरी संघटनेचे नेते मोहन गुंड यांनी सांगितले आहे.

एकंदरीतच सरकारी पातळीवर आधुनिक तंत्रज्ञाना साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते परंतु हे आधुनिक तंत्रज्ञान महागडे असून ही वापरण्याबाबत त्या प्रमाणात कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. अंतिमत: नुकसान हे शेती आणि शेतकऱ्यांचे होते.


Full View



Tags:    

Similar News