सेक्स करा आणि पैसे कमवा ? । नक्की पहा एका जिगोलोची गोष्ट!

सध्या बेरोजगारीमुळे सध्या अनेक तरूण देहविक्रीचा अवलंब करतात. कारण देहविक्री करणाऱ्या महिला असतात तसे देहविक्री करणारे पुरूष देखील असतात. अशा जॉबची डिमांड देखील असते. मुलांना हे करायचं देखील असतं. पण पुढे नेमक काय घडल वाचा या विशेष रिपोर्ट मध्ये.;

Update: 2022-10-03 04:32 GMT

कोव्हिड १९ च्या काळात ऑनलाईन शिक्षण  घेत मी माझं ग्रॅज्युएशन पुर्ण केलं. परिस्थिती नॉर्मल झाली. खुप ठिकाणी इंटर्व्ह्यु ला गेलो पण मला कुठेच जॉब मिळत नव्हता. त्यानंतर मग वय पण वाढत चाललं होतं. घरात पण पैसे द्यायचं होतं. आपल्याला स्वतःला थोडंसं नैराश्य येतंच आणि त्याच्या मुळे मग मी... मोबाईल आपल्याकडे असतो. थोडा मनात विचार आला. वाढत्य़ा वयानुसार आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत जातात आणि मग मी.. त्या गोष्टीचं नेट सर्फिंग करू लागलो. तर माझ्या समोर एक वेब साईट आली. www.playboysclub.in नावाची. आणि त्यांना मी मेसेज केला. आणि खुप रात्र झाली होती त्यामुळे त्यांचा रिप्लाय काही आला नाही. दुसऱ्या दिवशी मला रिप्लाय आला त्यांचा आणि त्यांनी मला लोकेशन विचारलं मी त्यांना सांगितलं.


माझं नाव माझ्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझं नाव, प्लेस या गोष्टी सांगितल्या. मग त्यांनी मला एक ऑडिओ क्लिप पाठवली. त्या ऑडीओ क्लिप मध्ये सगळं सांगितलं होतं की Exactly कॉलबॉयचं प्ले बॉयचं काम काय असतं. किती तास आपल्याला तिकडे थांबावं लागतं. कस्टमर कडे ते लोकं कसे पोहचवतात आपल्याला. अगदी सगळं सांगितलं गेलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला अगदी फ्री मध्ये पिक अप आणि ड्रॉपला तुम्हाला गाडी येईल. तुम्हाला तिथे कस्टमर पर्यंत पोहोचवेल. तुम्हाला सिक्युरीटी मिळेल तुम्हाला पोहोचवलं जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमर पैसै देईल. त्यातली २० टक्के अमाउंट तुम्हाला आम्हाला म्हणजे कंपनीला द्यायची आहे. कारण हे कमिशन बेस वर्क आहे.  तर अशी ती ऑडीओ क्लिप होती. आणि म्हटल ठीक आहे. कारण त्याच्यात काही मेंशन केलं नाही की एका मिटींगचे किती पैसै मिळणार काय  मिळणार... आठवड्याला अशा तीन मिटींग होणार म्हणजे अशा तीन असाइनमेंट ते आठवड्याला देणार... आठवड्यातून तीन दिवस आपल्याला फिमेल क्लाईंट ला सॅटीसफाय करायचंय. म्हटलं ठीक आहे आपण करूयात.


मी म्हटलं त्यांना की ओके मी रेडी आहे म्हणुन... मग त्यांची आणखी एक व्हॉइस रेकॉर्डिंग आली. त्यात त्यांनी सांगितलेलं की रजिस्ट्रेशन फी जी आहे ती तुम्हाला १५०० रूपये भरावी लागेल. त्यानंतरच तुमचं आयडी कार्ड तयार होईल आणि मग तुम्हाला पुढच्या गोष्टी सगळ्या करता येतील. तर मी म्हटलं ठीक आहे. १५०० रूपये ही काही फार मोठी रक्कम नाहीये. तर म्हटलं आपण भरूयात. आणि मी ती भरली. आणि त्यांनी अर्धा तास मला Wait करायला सांगितलं. तेवढा वेळ मी wait केलं. १५०० रूपये पाठवल्याचा स्क्रीन शॉट जो आहे तो मी त्याला पाठवला. मग अर्ध्या तासानं मला एक आयडी आला त्यावर माझा फोटो होता जो मी त्यांना पाठवला होता. माझं नाव होतं. माझं सेक्स लिहिलेलं होतं मेल फिमेल... मेल लिहिलं होतं. बर्थ असं लिहिलेलं होतं पण त्यांना मी दिलेली नव्हती कारण त्यांनी मागितली ही नव्हती. ती नव्हती त्याच्यावर इतकच मग त्याच्यावर प्लेस होतं. ते आल्यानंतर मी त्यांना क्युरीयॉसिटीने विचारलं. की एका मिटींगचे किती पैसे मिळतील मला? तर त्यांनी सागिंतलं की पंधरा हजार!


मग माझं माझं मीच गणित मांडलं की पंधर हजार जर मला देत असतील. त्यातले मला २० टक्के कंपनीला कमिशन द्यायचं आहे. मग त्यात ३००० रूपये approximately  जातात ३ टक्क्यांचे. तर ही चांगली गोष्ट आहे म्हटलं. आपल्याला १२ हजार एका मिटींगचे मिळतील आणि आठवड्याला अशा तीन मिटींग... महिन्या भरात असे चार आठवडे हे मी माझं माझंच गणित मांडलं होतं. विचित्र काम असलं सोसायटीच्या प्रमाणे तरी पण मी म्हटलं ठीक आहे चला करूयात.  दोन पैसै मिळतील या सगळ्या काळामध्ये...नोकरी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये.... तर मी हे करायचं ठरवलं. तर मी त्यांना म्हणालो oK!  त्यानंतर समोरून मला त्यांचा एक मेसेज आला. मनिष सरांचा त्यांनी नंबर दिला होता. म्हणाले की असाइनमेंट मॅनेजर आहेत. पुढे त्यांचा नंबर दिला म्हणाले की पुढे यांना कॉन्टॅक्ट करा. पुढच्या सगळ्या गोष्टी हेच तुम्हाला सांगतील.

त्याच्यानंतर मग त्या मनिष सरांना मी मेसेज केला Whats App ला. सर नमस्कार! मग मी तो आयडी जो होता त्यांनी दिलेला तो आयडी मी त्यांना पाठवला. की त्यांना लगेच लक्षात येईल की माझं बोलणं झालेलं आहे आधी एका सरांशी... मग त्यांनी लोकेशन विचारलं मी त्यांना लोकेशन सांगितलं. त्यांनी पिनक़ोड मागितला. पिनकोड दिला. आणि मग त्यानंतर त्यांनी मला एक ऍड्रेस पाठवला ठाण्याचा, माजीवाड्याचा, जुना आग्रा रोड जो आहे तिथल्या एका सोसायटीचा ऍड्रेस पाठवला. मग एका महिलेचा फोटो पाठवला जो वन सायडेड होता चेहरा पण व्यवस्थित कळत नव्हता. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. ऍड्रेस पण पाठवला आहे. सोबत गाडीतुन पण पाठवणार म्हटल्यावर मी इतका विचार केला नाही. माझ्याच विचारात होतो मी पण... ठीक आहे चांगली गोष्ट आहे.


आणि मग त्यांनी मला फोन करायला सांगितला. मी त्यांना फोन केला फोनवर आमची बोलणी झाली. ते म्हणाले की २ ते ३ तासाचं काम असेल. तुम्हाला जावं लागेल. अम्म.. पहिल्या मिटींगला तुम्हाला फक्त जाण्याआधी आम्हाला साडे चार हजार रूपये रीफंडेबल अमाउंट असते ती भरावी लागेल. तर मी म्हटलं का?  ना पण म्हणजे आताच मी पंधराशे रूपये भरलेत. तर त्यांनी मला त्यांच्या एका जुन्या जिगोलो बद्दल एक गोष्ट सांगितली. तो नवीनच होता, त्याचा पहिलाच दिवस होता, पहिलीच त्याची मिटींग होती. तो गेला तर... त्याला सांगितलं होतं जायला पण तो गेलाच नाही. त्याला वाटलं की कुणी माझं रेकॉर्डिंग करेल कुणी माझा व्हिडीओ शुट करून तो सोशल मिडीया साईट्स वर, पॉर्न साईट्स वर अपलोड करतील त्यामुळे तो गेलाच नाही. त्यामुळे खुप नुकसान झालं.  त्या ज्या फिमेल क्लाईंट होत्या त्यांनी कंपनी सोडली. तर अशा पध्दतीने मला सांगितलं. आणि म्हणुन या सगळ्या गोष्टी नको व्हायला. त्यामुळे जरी तसं झालं तरी त्यांच्या कडे ते चार्ज असतील ते पैसै असतील. ते साडे चार हजार रूपये जे आहेत  रिफंडेबल अमाऊंट आहे ती ते घेतात आणि फिमेल क्लाइंट ला भेटल्यानंतर ते पैसै आपल्याला पुन्हा परत देणार असं त्यांनी मला सांगितलं होतं.


तर मी विचार केला पुन्हा आणि मी साडे चार हजार रूपये त्यांना मी पाठवले. त्यांच्याशी पुन्हा मी पैसै  पाठवल्या नंतर मी फोन केला. त्यांना म्हटलं की मला तुम्ही क्लाइंटचा नंबर देणार होतात. कारण मला ते आधी म्हणाले होते की मी पैसै पाठवले साडे चार हजार रूपये की मला ते फिमेल क्लाइंटचा नंबर देतील, त्यांनी आधीही मला ऍड्रेस आणि फोटो पाठवला होता त्यामुळे मी म्हटल हो. आणि मग मी त्यांना नंबर साठी फोन केला. मी म्हटलं तुम्ही नंबर पाठवला नाही मला? तर त्यांना नंबर... दहा मिनिटांनी कारण दुसऱ्यांचं पण मी काम करतोय दुसऱ्या जिगोलोंचं काम करतोय तर दहा मिनिटं द्या मी तुम्हाला पाठवतो नंबर. मी पुन्हा दहा पंधरा मिनिटांनी त्यांना फोन केला. त्यावेळेस त्यांना मला सांगितलं की तुम्हाला घाई नव्हती, तुम्हाला संध्याकाळी पाठवतो कारण माझं बोलणं झालं तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी संध्याकाळी जाईन कारण तेव्हा मी फ्री असेन.


तर त्याच्यानंतर त्यांना मी फोन केला त्यांना म्हटलं की तुम्ही अजुन मला फोन नंबर पाठवला नाहीत. तर संध्याकाळी तुम्ही जाणार आहात तर तासभर आधी मी तुम्हाला नंबर पाठवून देईन. तर संध्याकाळी मी त्यांना फोन केला अर्धा पाउण तास आधी नियोजित वेळेच्या... आणि तिथुन त्यांनी माझा फोनच उचलणं बंद केलं. म्हणजे......फोनच उचलत नाहीयेत. फोन कट करतायत. दुसरा जो ज्यानंबर वर आधी बोलणं झालं आयडी कार्ड वगैरे ज्या नंबर वर मला मिळाला. त्या नंबरवरती मी फोन लावले तर ते उचलत नाहीयेत. ट्रु कॉलर वर फ़ोन स्पॅम वगैरे येऊ लागलं तेव्हा मी घाबरलो. आणि ते जे मनिष सर आहेत त्यांच्य़ा नंबर वर फोन केला की ट्रु कॉलरवर मनिष देवाशिष असं नाव आलं. मी त्यांना फोन करतोय करतोय पण ते उचलत नाहीयेत.


मग मी त्यांना व्हॉट्सॅपवर मेसेजेस करायला सुरूवात केली की तुम्ही माझा फोन का उचलत नाही आहात. आणि मला रिप्लाय का देत नाही आहात? कधी मला गाडी पिक अप करायला येणार आहे. तुम्ही सांगितलं होतं की फिमेल क्लाइंटचा नंबर तुम्ही देणार तोपण तुम्ही दिला नाही. मी पैसै भरलेत  तुम्ही रिप्लायच देत नाही आहात. तुम्ही फोनच उचलत नाही आहात. आणि त्यांनी माझ्या एकाही मेसेजचा रिप्लाय दिलेला नाही आहे. आणि मी काय करू मला कळत नाहीये सध्या. कारण ६ हजार रूपये माझे बुडालेत या सगळयामध्ये... आधीच मी बेरोजगार आहे आणि.....मी ज़ॉबच्या अपेक्षेनं हे सगळं केलं होतं. म्हटलं हे ही एक कामच आहे. हे काम केल्याने जर आपल्याला पैसै मिळत असतील तर आपल्याला हरकत नाही हे काम करायला. त्यामुळे मी हे सगळं केलं. माझे पैसै गेलेत या सगळ्यामध्ये मी काय करू?  काही कळत नाही आहे.

नमस्कार मी शुभम पाटील. मॅक्स महाराष्टचा पत्रकार आहे. आता जे काही तुम्ही ऐकलंत. खरी घटना आहे. खरी आहे. माझ्यासोबत घ़डलेली आहे. मी इन्वेस्टीगेट केलेली आहे. घडलेली आहे म्हणजे मी इन्वेस्टीगेट केलेली आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी घ़डत असतात आपल्या आजु बाजूला त्यापैकी ही एक आहे. मला दाखवायचं हेच होतं की सध्या बेरोजगारीमुळे सध्या अनेक तरूण अशा मार्गाचा अवलंब करतात. कारण देहविक्री करणाऱ्या महिला असतात तसे देहविक्री करणारे पुरूष देखील असतात. अशा जॉबची डिमांड देखील असते. मुलांना हे करायचं देखील असतं. त्यामुळे बरीच मुलं अशा प्रकारच्या साईट्स शोधत देखील असतात. आणि बऱ्याचदा फसले देखील जातात अशा पध्दतीने. पैसे कसे मागतात आणि अचानक फोन करणं. आणि मग भिती पोटी हे उघडकीस आलं तर माझीच नाचक्की होईल या भीती पोटी मुलं हे प्रकरण बाहेर काढत नाहीत किंवा पोलिसांकड तक्रार करत नाहीत.


त्यामुळे ज्या खऱ्या खुऱ्या जिगोलो पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा ज्या काही साईट्स आहेत. त्यांच्यावरचा विश्वास देखील इतरांचा उडून जातो. आणि त्यांची विश्वासार्हता कमी होते. जिगोलोचं काम वाईट आहे असं मी म्हणत नाही. देहविक्री करणाऱ्यांचं काम वाईट नाहीये. तो त्यांचा व्यवसाय आहे ते तो करतात. जिगोलो त्यांची नोकरी करतात. ते देहविक्री करून पोटापाण्यासाठी त्यांचा  पैसा कमवतात ते वाईट नाहीच आहेत. पण गोष्ट ही आहे की याच्या शोधामध्ये अनेक अशा साईट्स आहेत फेक ज्या वापर करून अशा पध्दतीने तरूणांना फसवतात. आणि नाईलाजास्तव भिती पोटी लज्जेपोटी हे तरूण पोलिसांमध्ये तक्रार करत नाहीत. अशा अनेक केसेस असतील. हे माझ्यासोबत घ़डलं मी ते इनव्हेस्टीगेट केलं.


आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला की हा सगळा स्कॅम आहे. मोठा स्कॅम आहे. विचार करा मी ६ हजार रूपये भरले. आधी दीड हजार मग साडे चार हजार... मी पत्रकार आहे मी ही गोष्ट तुमच्यासमोर बोलतोय ही गोष्ट मांडतोय. जर अशा पध्दतीने जिगोलो च्या जॉबसाठी अप्लाय करत असतील आणि पैसे देत असतील. आणि फसल्यानंतर गप्प बसत असतील. कारण समाजाची भिती, लाज, घरच्यांना काय वाटेल त्यांना माहित पडल्यावर एकंदरीत असं काहीही झालं असेल तर कृपया पोलिसांमध्ये तक्रार नोंदवा. मी देखील नोंदवणारच आहे. माझे पैसै मी जे भरलेत ते मी पुन्हा घेणार आहे. या साईट वरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि अशा इतर अनेक फेक साईट्स ज्या असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. याच मताचा मी आहे. 

 

हे जे प्रकरण होतं ते तुमच्या समोर येणं फार महत्वाचं होतं. आणि म्हणुन मी तातडीने तुमच्यासोबत हा संवाद साधला आणि त्यामुळेच ही जी कथा ही व्यथा मी तुमच्यासमोर मांडली. बस्स सजग राहा सावध राहा अशा गोष्टींपासून नोकरी मिळत नसेल तर ती मिळेल धंदा करा पण अं पोटापाण्यासाठी उद्योगधंदे करा लहान मोठेपण अशा पध्दतीने फसवले जाऊ नका. वेळ आली की नक्की तुम्हाला तुमची नोकरी मिळेल आणि हातात पैसा देखील येईल. धन्यवाद मी शुभम पाटील आपण पाहत होतात मॅक्स महाराष्ट्र! अशा व्हिडीओज आणि अशा स्टोरीज पाहण्यासाठी, वाचण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रला युट्यूब, फेसबुक आणि ट्विटरला फॉलो करा. सोबत आमची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com तिथे जाऊन भेट द्या. कारण सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहेत.


Full View

Tags:    

Similar News