#लॉकडाऊन_यात्रा – विमाने बंद करा, पण लोकल सुरू करा !

Update: 2021-01-09 14:49 GMT

गेल्या 8 महिन्यांपासून मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झालेले नाहीत. एकीकडे अनलॉक अंतर्गत अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. बसेस भरुन वाहतूक करत आहेत पण लोकल मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे सुरू करण्यात आलेल्या नाहीत. पण यामुळे सामान्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत.

नोकरीसाठी अनेकांना बसेसच्या रांगेत तासनतास उभे रहावे लागत आहे किंवा खासगी वाहनांनी खूप लांबचा प्रवास करावा लागतोय किंवा मग रिक्षा आणि ओला, उबरचा पर्याय आहे. पण दररोजचा खर्च परवडत नाही अशी अवस्था अनेकांची झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी आता वाढू लागली आहे. उल्हासनगरमधील नागरिकांचे म्हणणे काय आहे ते जाणून घेतले आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...

Full View


Tags:    

Similar News