#SriLankaCrisis : श्रीलंकेतील अराजकाचे कारण काय?

श्रीलंकेत निर्माण झालेल्या अराजकामुळे राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागला आहे. देशातील जनतेच्या हालअपेष्टांना ते जबाबदार आहेत, असा आरोप त्यांच्यावर झाला. पण श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीची कारण काय आहेत ते पाहूया...;

Update: 2022-07-17 02:19 GMT

श्रीलंकेत निर्माण झालेल्या अराजकामुळे राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागला आहे. देशातील जनतेच्या हालअपेष्टांना ते जबाबदार आहेत, असा आरोप त्यांच्यावर झाला. पण श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीची कारण काय आहेत ते पाहूया...

श्रीलंकेच्या आर्थिक संकटाची ३ प्रमुख कारणं आहेत.

१. आयातीवर खूप जास्त प्रमाणात अवलंबित्व

२. २०१९ नंतर परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट

३. बुडीत कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले

विस्ताराने पहायचे तर २००९मध्ये श्रीलंकेतील नागरी युद्ध संपले आणि तिथल्या सरकारने देशांतर्गत आर्थिक सुधारणांवर भर दिला. मात्र त्यानंतर २०१९मध्ये सरकारने आयकरात मोठी कपात केल्याने सरकारच्या महसुलावर परिणाम झाला. महसूल कमी झाल्याने सरकारी तिजोरीवरील ताण वाढला आणि आर्थिक गाडी घसरली.

त्यातच २०२०मध्ये कोरोना संकटामुळे देशातील उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला. यातून बेरोजगारी वाढली, आयात वाढल्याने महागाईदेखील वाढली. दरम्यान २०२१मध्ये श्रीलंका सरकारने परदेशी रासायनिक खतांवर बंदी घालून सेंद्रीय खतं वापरण्याचे धोरण स्वीकारले पण सेंद्रीय खतांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले, देशाची आर्थिक स्थिती आणखी खालावली. आंतरराष्ट्रीय बाजारातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्याने देशाची पत आणखी खालावली आणि त्याचा परीणाम महागाई वाढण्यात झाला.

Full View


Tags:    

Similar News