सोलापूरच्या गादेगावात गेल्या 75 वर्षापासून जपला जातोय आट्या-पाट्याचा पारंपारिक खेळ
आधुनिक युगात अनेक अंग मेहनतीचे पारंपारिक खेळ जवळपास बंद झाले असताना येत्या काही दिवसात हे खेळ लोप पावतील,की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. आजच्या युगातील युवक तंत्रज्ञानाच्या जगतात हरवला असताना तो पारंपारिक खेळ विसरला आहे. हेच पारंपारिक खेळ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या 75 वर्षापासून टिकवून ठेवला आहे. या गावातील ग्रामस्थ गेल्या 75 वर्षापासून आट्या-पाट्या या पारंपारिक खेळाच्या स्पर्धा भरवत आहेत. क्रीडा दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा..