स्किल ओरिएंटेड शिक्षण ही काळाची गरज...

Update: 2022-10-10 09:39 GMT

सध्या राज्यात नवीन शिक्षण प्रणाली लागू होत असल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.  स्किल ओरिएंटेड शिक्षण ही काळाची गरज आहे .कारण गेले अनेक वर्षापासून ही शिक्षण प्रणाली बदलली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शिक्षण झालं की ,  त्याला त्याच्या पायावरती उभा राहता यावं याच्यासाठी त्याला कमी कालावधीचे प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर जुन्या शिक्षण प्रणालीवर आधारित सध्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र त्यांना नोकरी मिळत नाहीत. त्यामुळे सुशिक्षित बेकारांची संख्या वाढत आहे. असे जर झाले तर बेरोजगारीचे प्रमाण अधिकच वाढेल .यामुळे नवीन शिक्षण प्रणाली राज्यात आणणे गरजेचे आहे. याविषयीचा मॅक्स महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट...

यावर बलभीम महाविद्यालाचे विद्यार्थी सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राचे आभार मानत आमचे सुशिक्षित बेकरांचे प्रश्न ते जाणून घेतल्या बद्दल आभार व्यक्त करतात. आमचे बी एड चे शिक्षण झाले आहे. आम्ही डिग्र्यावर डिगऱ्या घेत आहोत पण आम्हाला नोकरी मिळत नाही. क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा भरती निघत नाही अनेक वेळा प्रॅक्टिस करून सुद्धा नोकरी मिळत नाही. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये भरती कधी निघणार? हे आम्ही सरकारला विचारत आहोत. काही शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी पदभरती केली जाते मात्र त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचेच नातेवाईकांना भरती केले जात आहे. सध्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र घोटाळे दिसत आहेत व जे बोगस प्रमाणपत्र धारक आहेत, त्यांना प्राधान्य दिले जात आहे व जे विद्यार्थी खरोखरच प्रॅक्टिस करत आहेत त्यांना नोकरी मिळत नाही वय संपत आला आहे तरीही आम्हाला नोकरी मिळत नाही.




 


सध्याची जी शिक्षण प्रणाली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. सात वर्षापासून सरकारने नोकऱ्या काढल्या नाहीत, शिक्षण शिकण्यासाठी विद्यार्थी भरपूर प्रमाणात पैसे भरतात पास होऊन पुढे जातात. मात्र त्यांना नोकऱ्या मिळत नाही.सरकारच्या रिक्त जागा आहेत त्या भरत नाही. विद्यार्थ्यांकडून मात्र नुसता पैशाची लूटमार चालू आहे. जर त्यांनी जागाच काढला नाही तर नोकऱ्या कशा मिळणार ? एमपीएससी मार्फत ज्या जागा आहेत त्या सरकारने काढल्या पाहिजेत. खाजगीकरण बंद करून सरकारी नोकर भरती केली पाहिजे. येणाऱ्या नवीन शिक्षण प्रणाली मध्ये पारंपारिक व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. याच्यामुळे समाजामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्याचे पालक जर कुंभार असतील तर त्याने तोच व्यवसाय व्यवसाय निवडावा का कारण त्याला पुन्हा दुसरा पर्याय राहणार नाही.

याच्यामुळे जातीव्यवस्था निर्माण होईल, आणि पहिल्यांदा ज्याप्रमाणे जाती व्यवस्था निर्माण होईल. त्याप्रमाणेच पुन्हा एकदा ही जाती व्यवस्था निर्माण होईल, जसे जातीप्रमाणेच ब्राह्मण शूद्र वैष्य आणि क्षत्रिय अशी जात व्यवस्था निर्माण होईल. आपल्याला जे काम द्यायचे त्याच पद्धतीने त्याच त्या व्यक्तीने एक काम करायचे त्या व्यक्तीने तेच काम करायचे असे आपल्याला काम द्यायचे. पण तेच या शिक्षण प्रणालीत होत आहे. पहिलीची प्रथा होती ती आता चालू करायला लागले आहेत आणि विद्यार्थ्याकडून पैसे उकळले जात आहेत त्याच्या शिक्षणावर खर्च होत आहे परंतु त्याला नोकरी मिळत नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आमच्या अगोदरचे शिक्षण घेतलेले एम कॉम झालेले आहेत. ते आजही घरीच आहेत नोकरीचा तलाश मध्ये ते खूप कष्ट करत आहेत. शासनाने जी शिक्षण प्रणाली लादली आहे ती, आम्हाला मुळीच मान्य नाही, त्यांना आरोग्याच्या खाण्यापूर्वी रोजगारातून पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली व्यवस्थित व्हावी असे मला वाटते. सध्या खाजगीकरण हे खूप प्रमाणात वाढले आहे, सर्वांसाठी सारखा न्याय मिळावा हे असे मला वाटते. आपल्या भारत देशामध्ये गेल्या काही दिवसापासून एकही भरती झालेली नाही, त्यामध्ये पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक अशा विविध पदाच्या भरत्या झालेल्या नाहीत. आम्ही जर आमच्या शिक्षणाचे कागदपत्रे घेऊन एखाद्या कंपनीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी सांगितलं जातं. तुम्ही या पदासाठी पात्र नाहीत मात्र ज्या वेळेस त्यांच्या जवळचे नातेवाईक येतात त्या कमी क्वालिफिकेशनचे जरी असले तरी त्यांना घेतलं जातं. त्याच्यामुळे जवळच्या नातेवाईकांना नोकरी मिळतात मात्र दुसऱ्या शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही त्यामुळे सुशिक्षित बेकरांची संख्या वाढत आहे, असे सांगतात.

शैक्षणिक धोरण होतं ते फार वर्षापासून चालत आलेला धोरण होतं, धोरण कुठेतरी नवीन काळानुसार बदलणे गरजेचे आहे. पहिल्या काळी डिग्री घेतल्यानंतर लगेच मुलांना नोकरी मिळायची. आता नोकरीच्या अडचणी बऱ्याच आहेत विशेष म्हणजे विनाअनुदानित चा कारण जास्त आहे. अनुदानित पोस्ट लवकर उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे मुलं बेकार होऊ लागले आहेत, डिग्री घेऊन सुद्धा मुलांना काही काम मिळेना, दुधाच्या पायावर उभा राहता येईना.स्वावलंबी बनता येईना... अशा परिस्थितीमध्ये मुलांची उदासीनता झाली आहे, शिक्षणाच्या विषयी सायन्स चे मुलं ठीक आहेत, कॉमर्स पर्यंत येतात आणि आर्ट आणि सोशल सायन्स च्या मुलांना भविष्य नाही अशी थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे, कुठलीही शिक्षण प्रणाली असो त्यात बदल व्हायला पाहिजे, आपण नवीन नवीन क्षेत्रामध्ये काही गोष्टी आत्मसात करतो तशा शिक्षणामध्ये ही बदल केले पाहिजेत, शिक्षणामध्ये साचलेपणा आला होता तर तोच तोच पणा आला होता त्यामुळे आऊट ऑफ डेट या पद्धती झाल्या होत्या.

त्याच्यात बदल होणं आवश्यक होतं... स्किल ओरिएंटेड शिक्षण ही काळाची गरज आहे, मुलांना काहीतरी करता आलं पाहिजे का नुसतच कागदपत्र घेऊन डिगऱ्या प्राप्त करून, त्याचा कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उपयोग होत नाही. मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक आहेत पण त्यांना प्रशिक्षित मुलं मिळत नाहीत, वेगवेगळ्या विषयातील प्राप्त केला पाहिजे, कम्प्युटरवर काम करणं असेल किंवा फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी हे सर्व स्किल मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.त्यामुळे सर्टिफिकेट कोर्स वर जास्त भर दिला जाणार आहे व विषय जो असा होता कि, च्या मुलांनी आर्टच्या मुलांनी आर्टचे विषय घ्यायचे. आयुष्याच्या मुलांनी सायन्सच विषय घ्यायचे किंवा मग कॉमर्सच्या मुलांनी कॉमर्सचे विषय घ्यायचे, असे न करता एखाद्या आर्टच्या मुलांना वेगळा विषय निवडता येईल. मागच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना बंदिस्त केलं होतं... मुलांच्या इच्छेनुसार त्यांना विषय निवडता येणार आहेत, अनेक बदल जे आहेत ते या ठिकाणी केलेले आहेत, उच्च शिक्षण हे मातृभाषेतील जावं, अशा प्रकारचे संकेत हे शिक्षण प्रणाली मध्ये आहेत, मातृभाषा ही खरी जवळची भाषा असते. रोजच्या दैनंदिन येथील भाषा असते, ती सगळ्यात सोपी जाते प्रत्येकाला, मातृभाषेत शिक्षण द्यायचं आहे अशा अनेक गोष्टींमध्ये या शिक्षण प्रणालीमध्ये बदल केला आहे. त्याच्यामध्ये स्किल ओरिएंटल शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे मुलगा शिकून बाहेर पडला की त्याला त्याच्या पायावर उभा राहता यावं याच्यासाठी शिक्षण प्रणाली आणली आहे, असे एस.के महाविद्यालयाच्या प्राचार्य दीपा क्षीरसागर यांनी सांगितले.

पहिला मुद्दा आपण जो स्पर्श केलेला आहे आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये, त्याचा जर आपण मागवायचा ठरवला तर असं लक्षात येईल की, हे शिक्षण धोरण राजीव गांधीच्या कालखंडामध्ये ही पॉलिसी निश्चित करण्यात आली होती. त्याही वेळेला असं गृहीत धरण्यात आलं की, आजची शिक्षण प्रणाली रोजगाराभिमुख नाही. आणि स्वतः राजीव गांधी याबाबतीत, तांत्रिक दृष्टिकोनातून, किंवा या देशांमध्ये कॅम्पुटर चे युग जे आहे ते किंवा ICT चं योग निर्माण झाला आहे.पाया त्यांनी दाखवला होता परंतु त्याचा एकूणच त्याचे सर्व प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा याला कालावधी जाणं आवश्यकच होतं, या कालखंडामध्ये पारंपारिक शिक्षण जे आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स हे तर प्रचलित राहीलच, पण यादरम्यान प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत.याबद्दलची जागरूकता होऊन, प्रोफेशनल कोर्सला वेगळ्या प्रकारचा मानदंड तयार झाला आहे.




 


दुसरी या क्षेत्रात क्रांतीच म्हणावी लागेल,कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत कम्युनिटी कॉलेजेस, बिहू कॉलेजेस, यामधून काही प्रयोग झालेलेच आहेत. यातून काही चित्र असं समोर आलं कि... यामधून बिहू कॉलेज आणि कम्युनिटी कॉलेजमधून या कोर्सेसची निर्मिती जर आपण केली यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मुद्दा इतकाच आहे की, एकाच वेळी तुम्हाला दोन ठिकाणी शिक्षण घेता येत नाही, शैक्षणिक धोरणामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये डबल डिग्री घेणे, हा फार मोठा विषय आहे आपण आजपर्यंत शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत, प्रयोगशील राहिलेलो आहोत, आपण इंग्रजांनंतर या नवीन एज्युकेशन मध्ये सुरुवात झालेली आहे.आतापर्यंत झालेलं हे शिक्षण काही कमी ताकदीचं नाही, मला त्यांचा मोह आवरत नाही कारण डॉ बाबासाहेबांनी दिव्याखाली बसून जागतिक कीर्तीचे किचन विचारवंताने घटना तज्ञ झाले, तुमच्या आयसीटी किंवा मनुष्यबळातून त्याच्यातून अशी माणसे तयार होतील का... तुमची जी नेहरू आहेत ते अभिजात आहेत. अभिजात विषयाला सोडचिट्टी देऊन नवीन शैक्षणिक धोरण जर तयार होत असेल, त्यातलाही धोका आपण निश्चितपणे जाणून घेतला पाहिजे, आणि पुन्हा एकदा आपल्याला अभिजातकडे व अभिजातला धरूनच पुढे जावे लागेल,सर्वच प्रश्न तंत्रज्ञानाने सुटत नाहीत. आणि ते जर सुटले असते तर आज जे काही सोशल प्रॉब्लेम आहेत खास करून ही शिकलेली मुलं मेडिकल इंजिनिअरिंगची मुलं आजही त्यांचा वर्तनाचा आकृतीबंध पूर्णपणे बदललेला आहे, प्रसंगी ते हिंसकही होतात, प्रसंगी ते प्रामाणिकही होतात, ते प्रसंगी ते अप्रमानकही होतात, असं जर नसतं तर डॉक्टरांनी रॅकेट चालून रुग्णांकडून पैसे उकळत नसते, म्हणून नीतिमत्तेचे शिक्षण हे काळाची गरज आहे बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य सानप यांनी सांगितले.

तरुणाईला हेच आव्हान आहे की तरुणांईकडून खूप अपेक्षा असते, तुमच्या आई-वडिलांनी त्यांना अत्यंत पालखीच्या परिस्थितीमध्ये त्यांना शिकवलेलं असतं. ज्या फॅसिलिटी मिळतात त्याच्यातून त्यांना शिकवलेलं असतं, वडिलांसाठी समाजासाठी देशासाठी त्यांच्याकडून खूप सार्‍या अपेक्षा असतात. आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस असतात, त्याला न घाबरलं जाता आपण त्याला फेस केलं पाहिजे त्याला तोंड दिले पाहिजे. आयुष्यामध्ये विद्यापीठाची परीक्षा एकदाच दिली जाते मात्र सिल्याबस एकच असतो मात्र आयुष्यात दररोजचा सिल्याबस वेगवेगळ्या असतो रोज आपल्याला परीक्षा द्यावी लागते रोजच्या आव्हानांना घाबरून आपण डिप्रेशन मध्ये जाणं नशेच्या आहारी जाणे हे योग्य नाही. आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत, आपल्याला हे जीवन नशिबाने मिळालेला आहे. त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल, आपल्या कुटुंबीयांसाठी कसा उपयोग होईल, देशासाठी कसा उपयोग होईल, हे केलं पाहिजे. आजकाल मला खात्री आहे की लवकर या मिळत नाहीत, आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की 83% इंडस्ट्रीमध्ये स्किल में पावर मिळत नाही, मग हे स्किल आपण एक्वायर्ड करण्याचा प्रयत्न करावा स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करावा, आणि जे काही संकट येतील त्याला तोंड द्यावे, आपली कॉन्फिडन्स लेवल वाढली पाहिजे, हाच माझा त्यांच्यासाठी एक उपदेश राहील, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

Tags:    

Similar News