रौप्य महोत्सवी वर्षे साजरा करणारी नांदेड महापालिका , सांडपाणी व्यवस्थापनात मात्र नापास

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यंदा लाखो रुपये खर्च करीत ,महापालिकेचे रौप्य महोत्सवी वर्ष सांस्कृतिक कार्यक्रमाने दिमाखात साजरे करण्यात आले आहे , परंतु शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणासाठी ठोस पाऊले उचलली जात नसल्याचे चित्र आहे, ७ लाख इतकी लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराच्या सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनात नांदेड महापालिका नापास झाली आहे, प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Update: 2022-05-15 13:16 GMT

नदीला सर्वत्र माता म्हणून गौरविले जाते , ती प्रवाही, जीवंत आणि स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी सार्वजनिक पातळीवर मोठ-मोठाल्या घोषणा केल्या जातात परंतु दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या गोदावरी नदी ही सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून नदीचा ८ ते १० किमी इतका लांब प्रवाह सर्वत्र मलमूत्रांनीयुक्त आणि शेवाळलेले हिरवे पाणी पाहायला मिळत असल्याने भविष्यात ही नदी प्रदूषणाच्या बाबतीत धोक्याची घंटा ठरू शकते अशी चिंता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यंदा लाखो रुपये खर्च करीत ,महापालिकेचे रौप्य महोत्सवी वर्ष सांस्कृतिक कार्यक्रमाने दिमाखात साजरे करण्यात आले आहे , परंतु शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणासाठी ठोस पाऊले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. साधारणपणे ७ लाख इतकी लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराच्या सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनात नांदेड महापालिका नापास ठरत असल्याचे मतही पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.




 


नांदेड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता या शहराच्या सांडपाणी व्यवस्थापन संयंत्रणा (एसटीपी) उपाययोजनेची क्षमता १३२ दशलक्ष लिटर इतकी क्षमता आहे आणि नांदेड शहरातून बाहेर पडणारे सांडपाणी हे केवळ ६५ ते ७० एमएलडी इतकेच आहे तरीही ड्रेनेज आणि सांडपाणी हे नांदेडच्या गोदावरी नदीच्या शिरते यावर तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

यासोबतच पर्यावरण विभागाने मागील काळात नदी प्रदूषण उपाययोजना करण्यासाठी १७ कोटी रुपये निधी मंजूर केला त्यात नांदेड महापालिकेने ३.५ कोटी रुपये खर्च करणे अपेक्षित आहे . इतका सगळा निधी असताना नांदेडला नदीची स्वच्छता राखण्यात का अपयश येत आहे हाही प्रश्न उभा राहतो आहे .




 


नांदेडला व्याख्यानासाठी आलेल्या नि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर पर्यावरण तज्ज्ञ ऍड.असीम सरोदे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे की, सांडपाणी व्यवस्थापन त्यासोबतच जलसंपदा व प्रदूषण नियंत्रण महामंडळ विभाग हे सारे, नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष का करीत आहे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

यासोबतच पर्यावरण या विषयाचे अभ्यासक प्रा परमेश्वर पौळ यांनी बोलताना सांगितलं की, नांदेडच्या गोदावरी नदीचा ८ किमी लांब इतका प्रवाह दूषित होतो आहे. खरं म्हणजे गोदावरी नदीचे पाणी शुद्धीकरणाचे प्रमाण १४ पीपीएम असायला हवे आहे परंतु १४ जून २०२० ला ते ४ पीपीएम इतके खालपर्यंत गेले होते त्यामुळे गोदावरी नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडले होते ही अत्यंत गंभीर बाब आहे .




 


जीवन प्राधिकरण विभागाने दिलेली भूमिगत पाईपलाईन व्यवस्था ही पुरेशी नाहीये, मागील काळात राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांवर नदी प्रदूषणाचा ठपका ठेवत कारवाई करणार अशी सक्त ताकीद दिली होती ,त्यानंतर प्रशासनाने ५६ लाखाचे काम अवघ्या ६ महिन्यात करू असा शब्द दिला होता, त्यानंर केवळ डागडुजीशिवाय काहिच झाले नसल्याची खंत प्रा.पौळ यांनी व्यक्त केली आहे.

यावर बोलताना महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले की, नव्याने प्रस्तावित असलेला चुनाल नाला जो पर्यावरण विभागाच्या निधीतून नव्याने तिथेही एसटीपी प्लांट तयार होतो आहे ,तो तयार झाल्यावर नदीच्या पश्चिम भागातून जे पाणी नदीत मिसळत होते , ते पाणी येत्या ६ महिन्याच्या कालावधीत प्लांट पूर्ण झाल्यावर नदीत मिसळणार नाही ,त्यासोबतच स्वर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत आम्ही जुन्या पाईनलाइनची क्षमता वाढविण्यासाठी व ज्या भागात पाईपलाइन अस्तित्वात नाहीत तिथेही नियोजन करून भविष्यात शहरातील सांडपाणी नदीत मिसळणार नाही असे नियोजन करीत आहोत. असे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे. पर्यावरण विभागाच्या निधीतून महापालिकेच्या वतीने जो चुनाल नाला हा प्रकल्प उभारला जातो आहे , त्या नाल्याला एकूण ३६ नाले येऊन मिळतात त्यासोबतच तो भाग नदीच्या वरच्या भागात असल्यामुळे तेही पाणी सरसकट नदीत मिसळणे क्रमप्राप्त आहे ,म्हणून नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात अशीही मागणी तज्ज्ञांकडून होत आहे .

Full View

Tags:    

Similar News