कोरोना रुग्णांना मानसिक आधार, बिग बींच्या रुपाने रुग्णांशी संवाद
कोरोनाबाधीत रुग्णांना अनोख्या पद्धतीने मानसिक आधार देण्याचा प्रयत्न होतो आहे.
कोरोनाबाधीत रुग्णाला सर्वाधिक गरज असते ती मानसिक आधाराची....कोरोना झाला तरी घाबरु नका असा सल्ला सगळेच देतात...पण कोरोना झाला आणि बिग बी अमिताभ बच्चन स्वत: त्या रुग्णाशी ऑनलाईन संवाद साधत असतील तर त्या रुग्णाला मोठा मानसिक आधार मिळतो....रुग्णांशी असा संवाद साधणारे खरे अमिताभ नाहीयेत तर ते आहेत...
बिग बी यांच्यासारखेच दिसणारे प्राध्यापक शशिकांत पेडवाल..प्राध्यापक शशिकांत पेडवाल हे पुण्यात राहतात. आपण खरोखरचे अमिताभ नाही असे नंतर रुग्णांनाही स्पष्ट करतात. पण त्यांच्या शैलीचा रुग्णाच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झालेला असतो. कोरोनाबाधीत रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याचा कुटुंबिय़ांशी संवाद होत नसतो..त्यामुळे अनेक रुग्णांचा धीर सुटल्याचे आपण ऐकले असेल. त्यामुळे या काळात शशिकांत पेडवाल यांच्या रुपाने या रुग्णांना मोठा आधार मिळतोय...