Ground Report : अन्न नाही पोटाला लस नाही टोचायला...

लॉकडाऊनच्या काळात मोफत धान्य देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. सरकारने कागदावर केलेली ही घोषणा शहराबाहेर असणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या झोपडीत प्रत्यक्षात पोहोचली आहे का ? पाहा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Update: 2021-05-03 16:09 GMT

लॉकडाउनच्या काळात मोफत धान्य देण्याची घोषणा सरकारने केली आपण खरंच गरिबांच्या थाटात हे धान्य पोहोचले का हे शोधण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रने गाठला भटक्या कुटुंबांचा एक पाल.. सांगली जिल्ह्यातील विटा शहरालगत असलेल्या पालावर आम्ही गेलो आणि समोर आलं एक जळजळीत वास्तव.

"आमचे रेशन कार्ड माळशिरस तालुक्यातील आणि आम्ही कुटुंबासह जगायला या भागात आलोय. गावी धान्य घ्यायला कुणी नाही आणि इथे त्या कार्डचे धान्य मिळत नाही" अशी प्रतिक्रिया या लोकांनी दिली.



 हे झाले धान्याचे...आता राज्यात लसीकरणही सुरू आहे पण या लोकांपर्यंत अजून ते पोहचलेले नाही. यातील बहुतेक जण लस घ्यायला घाबरत देखील आहेत. सरकार करत असलेली जनजागृती या पालांपर्यंत पोहचतच नाही. आणि ती पोहचली तरी तितक्या लस देखील सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे भटक्या विमुक्तांमध्ये लसीकरणाचा टक्का हा कमी होणार आहे. याचा फटका या समूहांना बसणार आहे.Full View

Tags:    

Similar News