सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील क्रांती अग्रणी जी डी लाड या शेतमजूर वसाहतीत बल्ब लागू शकत नाही. मिक्सर चालू होऊ शकत नाही. एवढंच नाही तर कोणतेही वीजेचे उपकरण चालू शकत नसल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने महाराष्ट्रासमोर आणले होते. त्यानंतर अखेर सरकारने मॅक्स महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल घेतली आहे.
'या वस्तीत पेटू शकत नाही विजेचा बल्ब' या बातमीद्वारे मॅक्स महाराष्ट्रने कुंडल येथील क्रांतीअग्रणी जी. डी. लाड या शेतमजूर वसाहतील विजेचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणला. या बातमीची दखल घेत या वसाहतीत विज जोडणीचे काम सुरु करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लोकांची हि समस्या सुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यावर समाधान व्यक्त करत या गावातील नागरिकांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत.
'या' रिपोर्टची घेतली दखल