रशिया-युक्रेन युद्धाचा थेट फटका गृहिणींच्या किचनला...
युध्द नको बुध्द हवा असा संदेश देणारा भारत युक्रेन- रशिया युध्दात तटस्थ असला तरी इंधनाबरोबरच खाद्यतेलांचे दर गगणाला भिडले आहेत.. 130 रुपये प्रति किलो मिळणारे खाद्यतेल तब्बल 180 रुपये प्रति किलो झाले आहे बुलढाण्यावरुन संदिप वानखडेंचा रिपोर्ट;
रशिया आणि युक्रेन या देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका थेट तुमच्या आमच्या घराला बसतोय असं जर का आम्ही म्हटलं तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. सध्या रशिया युक्रेन या देशावर मोठ्या प्रमाणात सैन्यबळ पाठवून आक्रमक करतय, तेथील महत्त्वाच्या शहरांना टार्गेट केलं जातंय.. त्यामुळे या युद्धजन्य परिस्थिती मध्ये युक्रेनची पूर्ण दानादान उडाल्याचं आपण पाहिलंय.. त्यामुळे या युक्रेनमध्ये मधून भारतात येणाऱ्या खाद्यतेलाची आयात ही थांबली आहे.. याचा थेट परिणाम आता तुमच्या आमच्या घरातील किचनला जाणवतोय..
गृहिणी आशा देवकर म्हणाल्या, काही दिवस आधी सोयाबीनचे खाद्यतेल असेल किंवा सुर्यफुलाचे खाद्यतेल असेल 130 रुपये प्रति किलो दराने मिळायचं, मात्र उक्रेन मधून येणारी खाद्यतेलाची आयात अचानक खालावल्याने या खाद्य तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे... त्याचा फटका आता थेट गृहिणींना सोसावा लागतोय.. या खाद्य तेलाच्या दरात झालेल्या कमालीच्या वाढीमुळे घराचं बजेट पूर्णता कोसळल्याचे याठिकाणी गृहिणींकडून सांगितल्या जात आहे..
राज्यभर 180 रुपये प्रति किलो दराने पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल मिळत आहे.. शेंगदाणा तेलाची बरोबरी आज पामतेल करू लागलय, त्यामुळे या अचानक वाढलेल्या तेलांच्या दरामुळे घराचा प्रपंच मर्यादित उत्पन्नात कसा चालवावा असा प्रश्न अनेक महिलांना पडलाय.. असं गृहिणी प्रीती तोडकर म्हणाल्या.
रशिया- युक्रेन युध्दाचा आज ११ वा दिवस... नाटोसह युरोपिअयन युनियन युध्द विरामासाठी प्रयत्न करत आहेत...इंधन दरवाढीच्या भितीबरोबरच खाद्यतेलाच्या भाववाढीनं सर्वसामान्य माणुस मेटाकुटीला आलाय... युध्द नको बुध्द हवा असं म्हणण्याची वेळ आता सर्वसामान्यांबरोबरच महागाईची झळ बसलेल्या गृहीनींवर आली आहे...