Ground Report : १५ दिवसांनंतरही दरड हटवण्याचे काम सुरूच, २ गावांचा संपर्क नाही

Update: 2021-08-08 02:41 GMT

 रायगड जिल्ह्यासह सबंध कोकणात जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महापुरान थैमान गातले. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. 22 जुलै रोजी अतीवृष्टी दरम्यान पोलादपुर तालुक्यातील वाकण उमरठ भागामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. याबरोबरच महापुराने अनेक रस्ते खचले आणि वाहून गेले. मोठ्या प्रमाणात डोंगर खचून दगड मातीचे ढिगारे रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आता काही ठिकाणी वाहतूक सुरळीत झाली आहे. पण अजूनही काही ठिकाणी दरड हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक आदिवासी वाड्यांना जाण्याचा रस्ता बंद आहे.



 

उमरठ ते ढवळे या केवळ दहा किलो मीटर अंतरामध्ये आठ ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. अजुनही हे काम पुर्ण झाले नसून चार ते पाच दिवस लागणार आहेत. रस्त्यावर कोसळलेल्या या दरडींमुळे ढवळे आणि खोपड या दोन गावांचा मुख्य रस्त्याशी असलेला संपर्क तुटला आहे. इथल्या परिस्थितीची आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...

Full View
Tags:    

Similar News