तासगाव तालुक्यातील दुसरा रेशनिंग घोटाळा :राज्यव्यापी घोटाळा असल्याचा संशय
सर्वसामान्य जनतेच्या पोटापाण्याशी सबंध असलेल्या रेशनिंगमधे आता घोटाळेबहाद्दरांना प्रवेश केला आहे. सांगली जिल्ह्यातीला एका रेशन घोटाळ्याची चौकशी सुरु असताना पुन्हा एकदा दुसरा घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे, प्रतिनिधी राजाराम सकटेंचा ग्राऊंड रिपोर्ट...
सांगली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा घोटाळा असून मागील काही महिन्यात पूर्वी तत्कालीन तहसीलदार यांनी चक्क धान्य वाटपाच्या अनुदानावरच डल्ला मारल्याचे तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली होती.या संबंधित सांगली जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठाधिकारी यांनी संबंधित चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले, मात्र ते अश्वासन वेळ निधून गेल्या नंतर आश्वासन हवेत विरघळ्याचे आता सामाजिक कार्यकर्ते बोलू लागले आहेत.हा रेशनिग घोटाळा सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यभर याची व्यापती असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चर्म उधोग कामगार सेनेचे सरचिटणीस विनोद पाखरे यांनी केले.
दरम्यान यावेळी बोलताना पाखरे म्हणाले,विसापूर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रेशनिंग घोटाळा चालू आहे. हा घोटाळा एक कोटी दहा लाख रुपये एवढा मोठा घोटाळा रेशनिंग चा घोटाळा असल्याचा दावा पाखरे यांनी केला आहे.याबाबात आम्ही संबंधित विभागाला वारंवार तक्रारी दिल्या होत्या.मात्र याबाबत अजून पर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या ठिकाणी डाळ,गहू,तांदूळ, रॉकेल, हे नियमित येते.मात्र येथील ग्रामस्थांना ते रेशनिंग त्यांना मिळत नाही.काही ग्रामस्थां अशिक्षित असल्याने त्यांना लिहिता वाचता येत नाही.अशा ग्रामस्थांचा येथील दुकानदार त्यांच्या अशिक्षित पनाचा गौर फायदा घेत, त्यांची लुबाडणूक करत असल्याचा आरोप यावेळी पाखरे यांनी केला.याबाबत लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी पाखरे यांनी केली असून,येत्या काळात जर कारवाई झाली नाही तर ,घंटा नाद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पाखरे यांनी दिला.
गावातील रेशन कार्ड धारक भरती माने यांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना म्हणाल्या, "आमच्या कुटुंब सहा माणसे आहेत,मात्र त्या पैकी पाच च माणसाचे धन्य मिळते". अशी माहिती यावेळी माने यांनी दिली.गहू बारा किलो मिळते.तांदूळ आठ किलो मिळते.मात्र शासनाकडून यांच्या नावावर पंधरा किलो गहू मिळते.व तांदूळ दहा किलो मिळत असताना ही त्यांना मात्र प्रत्येकी दोन किलो कमी रेशनिंग मिळत असल्याची माहि भरती माने (बी.पी.एल.कार्ड धारक) यांनी दिली.
विसापूर गावामध्ये तीन रेशनिंग दुकाने आहेत.त्यापैकी एक दुकानदाराला येणारे धान्य गहू 6382 किलो येतो.तर तांदूळ 4303 किलो एवढे येते.तूर डाळ 2056 किलो एवढी येते.तर साखर 28 किलो एवढी येते.हे सर्व शासनाकडून येणारे आकडे आहेत.तर त्या पैकी रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येणारे धान्य 5727 किलो गहू दिला जातो.तांदूळ 3848 किलो, तूर डाळ 1872 तर साखर 17 किलो एवढा माल वाटप केला जातो.त्या पैकी एकूण एका महिन्याचा शिल्लक माल गहू 1489किलो, तर तांदूळ 1131किलो, तर तूर डाळ 422 किलो,तर साखर 12 किलो एवढी प्रत्येक महिन्याला शिल्लक राहते.हा एका महिन्याचा माल शिल्लक राहतो.तर एका वर्षाचा एकूण माल फक्त एका दुकानदाराचा 27 हजार किलो एवढा माल शिल्लक राहत असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते उत्तम माने यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दिली.
आर.टी.आय.कार्यकर्ते उत्तम ज्यावेळी धान्य अनन्या साठी दुकानात जातात त्यावेळी फक्त त्यांनाच धान्याची पावती दिली जाते.इतर कोणत्याही ग्राहकाला धान्याची पावती दिली जात नसल्याची खंत यावेळी माने यांनी व्यक्त केली.ते म्हणाले की गावातील दुकानदार हे धन दटके आहेत.त्यामुळे त्यांच्या विरोधात गोर गरीब जनता कोणीही आवाज उठवत नाही.गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षे झाली त्या मालकांची दुकाने आहेत.त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण तक्रार द्यायला येत नाहीत.सर्वच ग्रामस्थ घाबरत असल्याचे मत यावेळी माने यांनी व्यक्त केले.माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता अस निदर्शनास आले की, मयत व्यक्तीच्या नावावर धान्य येते.शासनाकडून मयत व्यक्तीच्या नावावर धान्य येते,मात्र गावातील बी पी एल धारकला ते धान्य मिळत नाही.तर काही अशी नावे आहेत.की,त्या नावाची व्यक्तीच गावात नाही.असे धान्य गावात येते.तर या सर्व प्रकारची चौकशी करून ऑडिट करू संबंधित दुकांदारावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी माने यांनी केली.
याबाबत आम्ही रेशनिग दुकानदार उत्तम पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.ते म्हणाले माझ्या बाबतीत ज्या तक्रारी झाल्या आहेत त्या सर्व राजकीय हेतू पोटी तक्रारी केल्या आहेत.त्या तक्रारींमध्ये काहीही तथ नसल्याचे मत यावेळी उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.ते म्हणाले जे तक्रारदार आहेत ते मोठे श्रीमंत आहेत.त्यामुळे ते तक्रार करत असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.या संदर्भात आम्ही तासगवचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांना विचारणा केली असता ते म्हणाले,रेशनिग मध्ये होत असलेल्या अफरा तफरी संदर्भात मला अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही.तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित दुकानदारांची चौकशी करून कारवाई करू, असे अश्वासन यावेळी रांजणे यांनी दिले.