Exclusive : दोष सिद्ध तरी पदावर कायम, जे जे तील बोगस कलाकाराचा पर्दाफाश भाग-२

देशभरातील कलाकारांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधील बोगस कलाकाराची बोगस नियुक्ती झाल्याचं समोर आलंय. मात्र गेल्या दहा वर्षापासून हा बोगस कलाकार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य पदावर ठाण मांडून बसलाय. पण ही निवड बोगस असल्याचे गेल्या सात वर्षापुर्वीच समोर आलं असतानाही राजीव मिश्रा नावाचा बोगस कलाकार जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्य पदावर कायम आहे. त्यासंदर्भात प्रोफेसर बक्षी यांनी एक रिपोर्ट दिला होता. हा रिपोर्ट नेमका काय आहे? यासंदर्भातील खुलासा करणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा Exclusive रिपोर्ट...

Update: 2023-09-16 05:07 GMT

देशभरातील कलाकारांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधील बोगस कलाकाराची बोगस नियुक्ती झाल्याचं समोर आलंय. मात्र गेल्या दहा वर्षापासून हा बोगस कलाकार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य पदावर ठाण मांडून बसलाय. पण ही निवड बोगस असल्याचे गेल्या सात वर्षापुर्वीच समोर आलं असतानाही राजीव मिश्रा नावाचा बोगस कलाकार जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्य पदावर कायम आहे. एवढंच नाही तर याच कलाकाराला महाराष्ट्र शासनाचं कलासंचालनालयसुद्धा आंदण दिलंय...

राजीव मिश्रा यांची जे जे स्कूल ऑफ आर्टमधील आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्य पदावर बोगस नियुक्ती झाल्याचं आपण पाहिलं. यामध्ये राजीव मिश्रा यांनी नियुक्तीच्या अटीच पूर्ण न केल्या नाहीत. त्यामुळे राजीव मिश्रा यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय.

जे जे तील कॉलेज ऑफ आर्किेक्चर चे प्राचार्य राजीव मिश्रा यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीने बेकायदेशीरपणे निवड केली. पण या समितीत नेमकं कोण कोण होतं?

२०१२ मध्ये जे जे कॉलेज ऑफ आर्कटेक्चरच्या प्राचार्य पदासाठी मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू राजन वेळूकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची स्थापना करण्यात आली.

या समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर हेच होते.



कुलगुरूंनी नियुक्त केलेले सदस्य प्राध्यापक बी. पी. साबळे, तज्ञ कवस कपाडिया, रवी हाझरा, शिरीष देशपांडे याबरोबरच कुलगुरूंनी नियुक्त केलेले डॉ. व्ही एन मगरे याबरोबरच उच्च शिक्षण विभाग पुणे येथील संचालक मंजूषा मालवणे आणि काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे इंद्रजीत सिंह बक्षी हे या समितीत होते. त्यानुसार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य पदासाठी मुंबई विद्यापीठाकडून मुलाखती घेण्यात आल्या.

त्यातून जोगळेकर सुषमा, मिश्रा राजीव, शर्मा अंजली आणि अभिजीत शिरोडकर यांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. या कमिटीचे चेअरमन कुलगुरू राजन वेळूकर होते. या कमिटीने बहूमताने राजीव मिश्रा यांची निवड केली. तर या निवड समितीने दिलेल्या अहवालावर मंजुषा मालवणे यांची स्वाक्षरीच नाही. त्याबरोबरच प्रोफेसर बक्षी यांनी सदर उमेदवार अनुभव व शैक्षणिक गुणवत्तेनुसार अपात्र ठरत असल्याचा शेरा मारला आहे.



यानंतर प्रोफेसर बक्षी यांनी 7 फेब्रुवारी 2014 रोजी काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या अध्यक्षांना पत्र लिहून अत्यंत मुद्देसूद निरीक्षणं मांडली आहेत. त्यामध्ये राजीव मिश्रा यांनी सीओए आणि विद्यापीठाला चुकीची माहिती देऊन गुन्हा केला असल्याचे म्हटले आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राजीव मिश्रा यांना सेकंड क्लास असल्याचे त्यांच्या मार्कासमोर स्पष्टपणे लिहीले आहे.

प्राचार्य पदासाठी पदवी आणि पदव्यूत्तर पदवीत प्रथम श्रेणी आवश्यक आहे. त्यासाठी 65 टक्क्यांना प्रथम श्रेणी लागू होते. त्यामुळे मिश्रा अपात्र ठरतात.

कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पदासाठी त्याच विषयातील पदवी आवश्यक असते. मात्र याठिकाणी मिश्रा यांनी एम ई सिल्हील चे पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी पदवी न करता जी.डी आर्क मध्ये डिप्लोमा केला आहे. त्यामुळे त्यांचा विचार करायला नको होता.

राजीव मिश्रा यांनी पी.एचडी ची नोंदणई केली असल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात आधीच्या वर्षीच त्यांनी पी.एच.डी संदर्भात काहीच सादर न केल्याने त्यांची नोंदणी रद्द झाली होती. त्यामुळे त्यांनी पी.एच डी लिहायला नको होते.

याबरोबरच प्रोफेसर बक्षी यांनी निरीक्षणात स्पष्टपणे म्हटले आहे की, मिश्रा यांनी त्यांची चूक मान्य केली.

प्रोफेसर बक्षी यांना सीओएने नेमलेलं होतं. त्यामुळे त्यांना उमेदवाराच्या निवडीसंदर्भात निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार होते. मात्र त्यावेळी राजन वेळूकर यांनी प्रोफेसर बक्षी यांना बाजूला काढऊन मिश्रा यांची नियुक्ती केली. त्यामुळे राजीव मिश्रा यांची नियुक्ती ही फिक्स मॅच होती, असं प्रोफेसर इंद्रजित सिंह बक्षी यांनी म्हटले आहे.

त्यामुळे इंद्रजीत सिंह बक्षी यांनी रिपोर्ट दिल्यानंतरही राजीव मिश्रा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या प्राचार्य पदावर कुणाच्या आशिर्वादने आहेत? हा मात्र महत्वाचा प्रश्न उरतोय. पण हे प्रकरण इथंच संपत नाही. अशाच प्रकारचे बोगसगिरीचे आणखी काही खुलासे मॅक्स महाराष्ट्रवर करण्यात येणार आहेत.





Tags:    

Similar News