आगामी महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम जवळ आला आहे. यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत, राज्यात सत्ताबदल झाला आहे. मात्र या सगळ्यात सर्वसामान्यांना महानगरपालिकेकडून काय अपेक्षा आहेत? महानगरपालिकेकडून दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना केवळ कागदावर का राहतात? महानगरपालिकेतील रिक्त पदांची भरती का केली जात नाही? दिव्यांगांच्या बाबतीत राज्यकर्त्यांचे धोरण कुठे चुकतंय? काय आहेत पुण्यातील दिव्यांगांचे मूलभूत प्रश्न? यासंदर्भात दिव्यांग बांधवांचा जाहीरनामा जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...