Ground Report : आपलीच मोरी आणि मुतायची चोरी !

सार्वजनिक मुतारी तयारी झाली आणि मंत्र्य़ांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले पण आता नागरिकांना मात्र ती वापरण्यास मनाई आहे....शिदे गटातील आमदाराच्या मतदारसंघातील धक्कादायक प्रकार मांडणारा प्रसन्नजीत जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट....;

Update: 2022-08-06 12:36 GMT

देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांमध्ये शौचालयाची व्यवस्था चांगली ठेवण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची असते. पण कुर्ल्यातील काजूपाडा या विभागात 14 लाखांची सार्वजनिक मुतारी प्रभाग क्रमांक 163 चे माजी नगरसेवक आणि सध्याचे आमदार दिलीप लांडे यांच्या प्रभागात बांधण्यात आली आहे. पण उद्घाटन झाल्यानंतर ही मुतारी सामान्यांसाठी खुलीच करण्यात आलेली नाही. त्यातच या सार्वजनिक मुतारीची अवस्था दयनीय झाली आहे. महानगरपालिकेकडून 10 बाय 6 च्या सार्वजनिक मुतारीला तीन लाख रुपये खर्च होणे अपेक्षित होते. पण इथे १४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, एवढा खर्च कशासाठी असा सवाल इथले स्थानिक रहिवासी विचारत आहेत.




 


ज्यावेळी नवीन मुतारी बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून निधी मंजूर होतो. त्यावेळी जुनी सार्वजनिक मुतारी पूर्णपणे पाडून बांधणे गरजेचं असते. परंतु तेथील माजी नगरसेवक दिलीप लांडे यांनी असं न करता त्याच जुन्या सार्वजनिक मुतारीवर प्लास्टर करून स्टाईल लावण्याचे काम केलं आहे, असा आरोप इथले लोक करत आहेत. त्यामुळे जुन्या सार्वजनिक मुतारीची रंगरंगोटी केल्यानंतर 14 लाखांचा खर्च मुतारी बांधण्यासाठी कसा येऊ शकतो असाच येथील स्थानिकांना पडलेला प्रश्न आहे.




 



सार्वजनिक मुतारी बांधून झाल्यानंतर त्याचे उद्घाटन शिवसेनेच्या बड्या मंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. ही सार्वजनिक मुतारी फक्त उद्घाटनाच्या दिवशी सुरू ठेवण्यात आली होती, पण त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ही मुतारी बंद आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

तसेच सार्वजनिक मुतारीची स्वच्छता ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या दक्षता विभागाकडून पाहणी केली जाते. परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी इकडे फिरकलेच नाहीत अशी इथल्या स्थानिकांची तक्रार आहे.


दिलीप लांडे काय म्हणाले

सार्वजनिक मुतारी बांधण्यासाठी 14 लाख खर्च कसा येऊ शकतो या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांनी प्रतिक्रिया दिली महानगरपालिकेला आम्ही मुतारी बांधण्यासाठी किती खर्च अंदाजे येऊ शकतो ते आम्ही महानगरपालिकेला सांगतो. महानगरपालिका ठरवते की आम्हाला किती निधी देयाचा.

साहाय्यक आयुक्त महादेव शिंदे काय म्हणाले 

साधारणपणे तेथील स्थानिक नागरिकांनी पाईपमध्ये खडे टाकलेले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी सार्वजनिक मुतारी बंद ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक मुतारीसाठी 3 लाख खर्च येणे अपेक्षित आहे. पण 14 लाख खर्च कसा येऊ शकतो. त्यांनी या प्रश्नांवर बोलण्यास नकार दिला.


Full View

Tags:    

Similar News