मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट; कोरोनामुळे परीक्षा न दिलेल्यांना परीक्षेची संधी मिळणार

Update: 2021-01-01 12:45 GMT

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एसपीएसी)च्या 322 पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी घेतल्या जाणा-या परिक्षेसाठी कोरोना झाल्यामुळे कॉस्टेबलना परिक्षा न देऊ शकणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या पाठपुराव्यानंतर आणि मॅटकोर्टाच्या सुचनेनंतर एमपीएसीच्या अधिका-यांनी अधिकृत पत्र जारी केले आहे.

पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धेसाठी एमपीएसीने शारिरीक चाचणीसाठी परीक्षा आयोजित केली होती. पण याच वेळी काही उमेदवारांना कोरोना झाला होता. कोरोनाशी लढाई करताना अनेक पोलिस कॉस्टेबल यांनी आपला जीवही गमावला आहे. त्यामुळे त्यांचे काम जोखीमीचे आहे. ज्या उमेदवारांनी आपल्याला कोरोना झाला आहे आपल्याला पुन्हा परिक्षेची संधी द्यावी अशी विनंती केली होती. पण एमपीएसमध्ये असलेले अधिकारी मात्र हे ऐकायला तयार नव्हते अखेर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. या प्रकाराची माहिती मॅक्स महाराष्ट्रला कळताच मॅक्स महाराष्ट्रनेही मानवतेच्या दृष्टीने त्यांची बाजू लावून धरली आणि मंत्री नितीन राऊत, एमपीएसीचे अधिकारी प्रदीप कुमार यांची भेट घेऊन या उमेदवारांना पुन्हा संधी मिळाली पाहिजे अशी मागणी केली. या प्रकारानंतर एमपीएसने कोरोना बाधित उमेदवारांना संधी देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार येत्या 15 जानेवारीला शारिरीक चाचणी परिक्षा होणार असल्याचे परिपत्रक काढले आहे. पण हे परिपक्षत्र काढताना अधिका-यांनी लागलीच पंधरा दिवसात परिक्षा घेण्याचे ठरवले असून या मागे काही कारस्थान असल्याचे सांगण्यात येते. कोरोना बाधित असल्यामुळे उमेदवारांना शारिररीक कमजोरी असू शकते आणि ते पुन्हा पुर्ववत तंदुरस्त होण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागतो. असं असताना मॅटच्या सुचनेनुसार एमपीएसीने लागलीच 15 दिवसात परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एपीएसीने आरक्षणासहीत जाहिरात काढून 322 पीएसआय पदांसाठी 10 सप्टेंबर 2017 रोजी पूर्व परीक्षा घेतली. त्यानंतर 24 डिसेंबर 2017 झाली मुख्य परीक्षा झाली. जाहिराती नुसार अनुसूचित जातींसाठी 44 अनुसूचित जमातींसाठी 36 विमुक्त जातीं 5 भटक्या जमाती साठी 10 विशेष मागासवर्ग प्रवर्ग साठी 6 आणि खुल्या प्रवर्गासाठी 158 जागा अशा 322 जागांची जाहिरात करण्यात आली होती. पोलिस विभागात कॉन्स्टेबल असलेल्या आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेल्या तरुणांना ही मोठी संधी आहे. हजारो जणांनी परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल तातडीने लावण्याचा प्रयत्नं काही अधिकारी करत असून यामागे षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे.

एमपीएसीने या प्रकरणाचा निकाल लावताना आरक्षणाचे नियम बाजूला ठेवण्याचा प्रयत्नं केला जात असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक समिती घोषित करून प्रमोशनमध्येही आऱक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत समितीमध्ये झालेला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला जाणार असून त्या आधीच एमपीएसी च्या पीएसआय परिक्षेचा निकाल जाहिर करण्याचा घाट घातला जात आहे. या संदर्भात मंत्री नितिन राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रमोशन देताना आरक्षण देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्नं असून एमपीएसीला तशा सूचना केल्या जातील असे सांगितले.

Similar News