शासकीय वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?
शासकीय वसतिगृहांमुळे प्रतिकूल परिस्थितही विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेता येतं. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश कसा मिळतो, याची प्रक्रिया समजावून सांगत आहेत आमचे प्रतिनिदी गौरव मालक
दहावी बारावी नंतर अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरांमध्ये जातात मात्र घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने या विद्यार्थ्यांना शहरांमध्ये राहणे व आणि जेवणाचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत मात्र गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत सामाजिक न्याय विभागाची शासकीय वसतिगृह असतात,हे तुम्हाला माहिती आहे का? या वसतिगृहांमध्ये राहण्यापासून ते शैक्षणिक साहित्य खरेदीपर्यंत शासन मदत करते.
ही वसतिगृह सुखसुविधांनी सुसज्ज आहेत. पण शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया कशी असते?कोणत्या सुख सुविधा दिल्या जातात?प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पात्रता काय असते? अशा विद्यार्थी व पालकांच्या मनातील पश्नासंदर्भात संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी येथील ग्रुप अधीक्षक जैन सर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.