२०१८-१९ मधल्या आर्थिक स्थितीचा विचार करता या २०१९-२० या आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या विविध क्षेत्रांवर त्याचा कसा परिणाम होणार आहे याचा आढावा आपण घेत आहोत. जागतिक स्तरावर विविध देश, सार्वजनिक कंपन्या, मोठमोठे उद्योग यांना अर्थविषयक मार्गदर्शन करणाऱ्या KPMG या फर्मच्या अहवालानुसार आपण तिसऱ्या भागात पाहणार आहोत वाहन आणि वाहनांचे सुट्टे भाग तयार कऱणाऱ्या उद्योगापुढीलं आव्हानं
उद्योगाचा आढावा थोडक्यात
उद्योगाचे विकासदर आणि रोजगारातील योगदान | · वाहनं- ७.१ टक्के · वाहनांचे सुटे भाग – २.३ टक्के · रोजगार- ४ कोटी |
निर्यातीसाठी महत्त्वाची बाजारपेठ | · अमेरिका, मेक्सिको,बांग्लादेश, आफ्रिका विभाग आणि आशिया |
आयातीसाठीचे महत्त्वाचे देश | चीन, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान आणि थांयलंड |
भारतातील वाहन उद्योगाची महत्त्वाची केंद्रे | चाकण-महाराष्ट्र,ओरागादम-तामिळनाडू, NCR, साणंद-गुजरात |
एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी या क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण | ५.२ टक्के (एप्रिल २००० ते डिसेंबर २०१९) |
उद्योगावरील सध्या आणि भविष्यात होणार परिणाम
- पैशांच्या उपलब्धतेत कपात झाल्याने बाजारपेठेवर परिणाम होणार
- प्रवासी वाहनं आणि टू/फोर व्हिलर वाहनांचे क्षेत्र
या क्षेत्रातील मंदी कायम असल्याने मागणी वाढण्याची शक्यता नाही. त्यातच आताच्या परिस्थितीमुळे या क्षेत्राला आणखी मोठा फटका बसला आहे. त्यात ग्राहकांची क्रयशक्ती नसल्याने मागणी वाढण्याची शक्यता नाही.
- व्यावसायिक वाहनांचे क्षेत्र
अनावश्यक सेवांवर लॉकडाऊनमुळे बंदी असल्याने व्यावसायिक वाहनांची मागणी घटणार
तरलता आणि रोखतेच्या अभावामुळे आधीच विक्री कमी झाली असताना पुढच्या काही महिन्यात परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता
- वाहननिर्मिती कऱणाऱ्या कंपन्यांना त्यांचे नवीन उत्पादन लाँच कऱण्याची योजना ग्राहकांची क्रयशक्ती वाढेपर्यंत पुढे ढकलावी लागणार
- ग्राहक जीवनावश्य वस्तू म्हणजे अन्न आणि औषधांवर खर्च करण्यास प्राधान्य देणार असल्याने इतर वस्तू खरेदीची विचार पुढे ढकलला जाईल. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर वाहनांच्या बाजारपेठेत तेजी येऊ शकेल.
- जागतिक स्तरावर वाहनांच्या सुट्या भागांचा पुरवठा करणारी साखळी विस्कळीत झाल्याने वाहनांचे सुटे भाग महागण्याची शक्यता
काही महत्त्वाच्या शिफाऱशी
करांसंदर्भात शिफारशी
- मागणीमध्ये वाढ होण्यासाठी शॉर्टटर्म जीएसटीमध्ये कपात करता येऊ शकते
- GSTची देणी स्थगित केल्यास तरलता वाढू शकते
- करांचे ऑडिट थांबवले तर उद्योजकांमध्ये विश्वास निर्माण होईल
- निर्यातदारांसाठी GST परतावा आणि इतर सरकारी प्रक्रिया वेगाने केल्यास उत्साह वाढेल
- वाहन कर्जावर कर सवलत दिल्यास मागणी वाढू शकते
एकूणच या भागात आपण पाहिले की कोरोनाचा फटका वाहन उद्योगाला मोठ्या
प्रमाणात बसल्याने सरकारने आता या उद्योगासाठी काही विशेष निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे.
KPMG Report: कोरोना संकटामुळे येता काळ अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ! – भाग 1
KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कापड-तयार कपड्यांचा उद्योग – भाग 2
KPMG Report: कोरोनाचे संकट आणि बांधकाम उद्योग – भाग 4
KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने – भाग 5