ऐन सणासुदीच्या दिवसात पोलादपूर तालुक्यात वीजसमस्या गंभीर बनली असून विजवितरण विभागाच्या भोंगळ आणि गलथान कारभाराच्या विरोधात येथील जनता आक्रमक झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या विरोधात काढण्यात आलेल्या सर्व पक्षीय मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरमसाठ वाढीव विज बिल, अधिकाऱ्यांची अरेरावी, अवेळी आणि सातत्याने विज खंडीत होण्याच्या घटना याचा जाब या मोर्चाच्या माध्यमातुन पोलादपुरकरांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला.....