10 वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच आले नाहीत...
10 वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच आले नाहीत,काय आहे धक्कादायक प्रकार वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची स्थिती दात आहे तर 'चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत'. अशी झाली आहे. वेंटीलेटर आहे तर ऑक्सिजन नाही. दवाखाना आहे तर डॉक्टर नाही. अशा परिस्थितीला महाराष्ट्राची जनता जात आहे.
त्यातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. तरीही अजुनही प्रशासन गांभीर्याने काम करतंय का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काही गावांमध्ये आज ही आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा प्रयत्नातून गावात आरोग्य उपकेंद्रांची इमारत उभी तर राहिली. मात्र, ती इमारत धूळ खात पडली आहे.
पाटण तालुका हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम आहे. तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेली 32 गावे यांच्या आरोग्याचा विचार करता दिनांक 9 ऑगस्ट 2009 रोजी एका रुग्णालयाचे उद्घाटन झाले. ही इमारत आज धुळखात पडली आहे. या रुग्णालयात डॉक्टर नसल्यानं या पठारावरील 32 गावे व 40 हजार नागरिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या सुविधेपासून वंचित आहेत. वारंवार लेखी व तोंडी तक्रारी देऊन देखील प्रशासनाला या ठिकाणी एक डॉक्टर मिळाला नाही.
आठ ते दहा वर्षापासून घाणबी येथे आरोग्य केंद्राची इमारत उभी असून डॉक्टरांच्या अभावी या इमारतीमध्ये शुकशुकाटच पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये कोरोना आजाराने थैमान घातले आहे. त्यातच गेल्या 7 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांचा कडकडासह वादळी वाऱ्याने झोडपूण काढले आहे.
त्यामुळे शेती बरोबर पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी मिक्स झाल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पाण्यातील दूषित बॅक्टेरिया मुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.
संपूर्ण डोंगर पठारावर थंडी तापा ची साथ सुरु आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये डॉक्टर उपलब्ध व्हावेत अशी मागणी आता जनसामान्य जनतेमधून होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन या इमारतीमध्ये डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून बत्तीस गावं आणि वाडी वस्त्या यांच्या आरोग्याचं प्रश्न मिटेल.
पाटण ते घाणबी हे अंतर साधारण 25 किलोमीटर चे आहे. तर या पठारावरील शेवटचे गाव हे 35 किलोमीटर वर आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या घाणबी आरोग्य उपकेंद्राचा लाभ जनतेला होणार आहे.
मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना गावातले नागरिक सांगतात... अंतर जास्त असल्यामुळे गरोदर महिलांना प्रसूतीसाठी तालुक्याचा ठिकाणी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्रसूती होते. तर डॉक्टर व उपचारा अभावी काही महिलांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा दवाखाना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
या संदर्भात आम्ही ग्रामस्थांशी बातचीत केली...
आठ ते दहा वर्षापासून घाणबी येथे आरोग्य केंद्राची इमारत उभी असून डॉक्टरांच्या अभावी या इमारतीमध्ये शुकशुकाटच पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये कोरोना आजाराने थैमान घातले असताना गेल्या 7 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांचा कडकडासह वादळी वाऱ्याने झोडपूण काढले आहे. त्यामुळे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचा टाकीमध्ये ओढ्याचे पाणी मिक्स झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर पाण्यातील दूषित बॅक्टेरियामुळे साथीचा आजारांनी डोकं वर काढले आहे .
संपूर्ण डोंगर पठारावर ताप थंडी ची साथ चालू आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये डॉक्टर उपलब्ध व्हावेत अशी मागणी आता जनसामान्य जनतेमधून होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन या इमारतीमध्ये डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून बत्तीस गावे आणि वाडी वस्त्या यांची गैरसोय पासून मुक्तता होईल
शासनाचा लाखो रुपयाचा निधी जर आरोग्य उपकेंद्राचा इमारातींसाठी खर्च होत असेल तर त्या दवाखान्याला 10 वर्ष डॉक्टर का मिळत नसेल, तर लोकप्रतिनिधी फक्त इमारती उभा करण्यासाठी निधी आणतात का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
लोकप्रतिनिधी यांना फक्त लोकसभा. विधानसभा.पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकी पुरती डोंगर पठारावरील जनता दिसते. मात्र, आपली राजकीय पोळी भाजून घेऊन पुन्हा पाच वर्षे पठारावर तोंड दाखवत नसतात असे भाष्य यावेळी उपसरपंच आशा सपकाळ यांनी केले आहे .तर या बत्तीस गावांचा मध्यवर्ती ठिकाणी बांधलेल्या इमारत डॉक्टर विना धूळ खात पडली आहे. वारंवार तक्रार देऊन देखील आम्हाला न्याय मिळत नाही.
गेल्या सात दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाण्यामध्ये बॅक्टेरिया साचून साथीचे आजार वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना तालुक्यात हॉटस्पॉट बनत आहे. अशात डोंगर पठारावर दवाखाना नसल्याने चाळीस हजार लोकसंख्येचा भागात आरोग्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. असं यावेळी ग्रामस्थांनी म्हटलं आहे.
या संदर्भात मॅक्स महाराष्ट्राने पाटण तालुक्याचे तहसीलदार योनेश्वर टोम्पे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत संबंधित खात्याचा अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ त्या विभागात मी स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन भेट देणार आहे. तर कोरोनामुळे डॉक्टर यांना तीन शिफ्ट मध्ये सध्या काम करावे लागत आहे. त्यामुळे समायोजित करून डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या बरोबरच पाटण तालुका बी डी ओ मीना साळुंखे यांच्याशी आम्ही या संदर्भात विचारणा केली असता, सध्या डॉक्टर यांची कमतरता आहे तर वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करून डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे तोंडी आश्वासन त्यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना दिले आहे.
आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले यांच्याशी या संदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी सामुदायिक वैद्यकीय अधिकारी दिलेला असल्याचे सांगितले. मात्र, त्यांना जेव्हा मॅक्समहाराष्ट्रने वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुका अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधत घटनेची माहिती घेतली व लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितलं.
वरुन सद्यस्थितीला ग्राउंड लेव्हलला नक्की काय सुरु आहे. याची जाणीव देखील जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना नाही. तर मंत्रालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना याची माहिती असणं तर दूरच..