Ground Report: वीजबिल वसुलीने परीक्षांच्या काळात मनस्ताप, दागिने, गाड्या विकून बिलं भरण्याची वेळ
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून राज्यभरात नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. पण राज्य सरकारने आता विज बिल वसुलीची मोहीम सुरु केलेली आहे. या अंतर्गत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. पण महावितरणच्या या कारवाईने नागरिक त्रस्त झालेले आहेत.
अनेकांनी दागिने आणि गाड्या विकून वीजबिल भरण्याचा प्रकार कल्याणमध्ये घडलेला आहे. तर ऐन परीक्षेच्या काळात ही वीज कनेक्शन कापणीची मोहीम सुरू असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. नेमकी काय परिस्थिती आहे याचे वास्तव मांडणारा सीनिअर करस्पाँडंट किरण सोनवणे यांचा ग्राउंड रिपोर्ट.