आज धारूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर सडेतोड टिका केली आहे. त्या म्हणाल्या की,"गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना बीड इथं येऊन चक्क जाहीर सभा घ्यावी लागते हेच आमचं यश."
"राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची आपल्यासमोर उभं राहायची लायकी नाही," असे बोलून त्यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टिका केली. तसेच "पवारांनी अगोदर पक्षाकडं लक्ष द्यावं, मग जिल्ह्याकडे," असा सल्ला देखील पंकजांनी यावेळी दिला.
"राष्ट्रवादीच्या नेत्यांची आपल्यासमोर उभे राहायची हिंमत आणि लायकी नाही. ज्या पक्षात नेत्या नेत्यात एकी नाही त्यांनी काय आम्हाला टक्कर द्यावी, त्यामुळे पोरीसोरींशी लढण्यासाठी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला इथे मुक्काम ठोकावा लागतो, दरम्यान, कितीही तयारी करा, मी कोणलाही घाबरत नाही. आगामी निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.