गरिबांचा 'रथ'महागला
गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळेच या गाड्यांच्या तिकीट दरात ही भाडेवाढ करण्यात आली होती. पण कोरोना संपल्यानंतर ही पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस चा दर्जा कायम ठेण्यात आल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट;
गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळेच या गाड्यांच्या तिकीट दरात ही भाडेवाढ करण्यात आली होती. पण कोरोना संपल्यानंतर ही पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस चा दर्जा कायम ठेण्यात आल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट
दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली असताना कोरोनाच्या काळात गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळेच या गाड्यांच्या तिकीट दरात ही भाडेवाढ करण्यात आली होती. पण कोरोना संपल्यानंतर ही पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस चा दर्जा कायम ठेण्यात आल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सर्वसामान्य लोक पॅसेंजर गाड्यांना तिकीट कमी असल्याने या गाड्यातूनच प्रवास करत होते. त्यांना सोलापूर ते पुणे,पुणे ते सोलापूर असा प्रवास स्वस्तात करता येत होता. तो त्यांना कोरोना संपून एक वर्ष झाल्यानंतरही करता येईना गेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा देण्यात आलेला दर्जा रद्द करण्यात यावा,अशी मागणी प्रवाशातून आणि प्रवाशी संघटनांकडून करण्यात येवू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे प्रशासन कोणत्या प्रकारची भूमिका घेते,याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाढत्या महागाईचा फटका रेल्वे प्रवासावर
पेट्रोल, डिझेल,गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच प्रवाशी वाहतुकीत भाडेवाढ झाली असल्याचे दिसून येते. पण पूर्वी महागाई वाढत असताना रेल्वे प्रवासाचे दर मात्र स्थिर असायचे. एसटीने पुण्याला तीनशे ते साडे तीनशे रुपयात जाता येत होते. कोरोनाच्या आधी अवघ्या 40 ते 50 रुपयात पुण्याला जाता येत होते. पण ऐन कोरोनाच्या काळात पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला. कोरोनाचा काळ असल्याने यावर प्रवाशी काही बोलू शकत नव्हते. कोरोना जावून एक वर्षाचा कालावधी संपत आला,पण आणखीन ही पॅसेंजर गाड्यांना देण्यात आलेला एक्स्प्रेस चा दर्जा काढून घेण्यात आला नसल्याने प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना रेल्वेने आता तरी पूर्वी प्रमाणे प्रवास करता यावा,यासाठी रेल्वे प्रशासनाने विचार करून पुन्हा या गाडीला पॅसेंजरचा दर्जा देवून तिकीट दर कमी करावा,असे प्रवाशांना वाटत आहे. यावर रेल्वे प्रशासन काय भूमिका घेतेय,याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
पॅसेंजर गाडीच्या असुविधेबद्दल प्रवाशातून तीव्र नाराजी
सोलापूर - पुणे,पुणे - सोलापूर पॅसेंजर गाडी आता डेमो च्या स्वरूपात धावू लागली असून तिच्यात मोठ्या प्रमाणत बदल झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डेमो गाडीत स्लीपर सिट नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा प्रवास करत असताना प्रवाशांना झोपता येत नाही. रात्रीच्या वेळी डेमोने प्रवास करतेवेळी प्रवाशांना डब्यात खाली झोपावे लागत आहे. या गाडीतील सिट बद्दल ही प्रवाशातून तक्रारी करण्यात येत आहे. या गाडीतील सिट वर बसल्यानंतर गाडी चालत असताना प्रवाशी सिट वरून आपोआप खाली घरून जात आहेत. त्यामुळे या गाडीत नीट झोपता ही येत नाही आणि बसता ही येत नाही. गाडी पॅसेंजर प्रमाणे प्रत्येक थांबा घेते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाडीला एक्स्प्रेसचा दिलेला दर्जा काढून घ्यावा. पूर्वी प्रमाणे पॅसेंजर सुरू करून तिकीट दरात कपात करावी. त्यामुळे पॅसेंजर गाडीला प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल,असे प्रवाशांना वाटत आहे.
अपंग प्रवाशांना रेल्वे तिकीटात दिलेली सुट रद्द केली का
कोरोनोच्या काळात रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले. याच काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नव्हते. कोरोनाच्या एक वर्षानंतर ही सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वे पूर्वी ज्येष्ठ नागरिक,अपंग व्यक्तींना तिकीटाच्या दरात सूट देत होती,ती आता बंद करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक आणि अपंग नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य जनेतेच्या दृष्टीने सुरक्षित आणि कमी पैशात,कमी खर्चात मानला जातो,पण अलीकडच्या काळात तो देखील महाग झाल्याने सर्वसामान्य जनतेतून उद्रेक पहायला मिळत आहे.
प्रवाशांना डेमोच्या डब्यात चढताना होतोय त्रास
रेल्वे पॅसेंजर गाडीने प्रवास करणारा प्रवाशी वर्ग हा ग्रामीण भागातील असून गाडीत चढत असताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. डेमो रेल्वेच्या डब्ब्याचा दरवाजा मोठा असल्याने ज्या रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मची सुविधा नाही,त्याठिकाणी वृध्द पुरुष,महिला,पुरुष,विद्यार्थी यांना डब्ब्यात चढण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. गाडीत चढल्यानंतर वृध्द पुरुष आणि महिलांना सिटवर व्यवस्थित बसता येत नसल्याने ते खालीच बसणे पसंद करतात. पूर्वीच्या रेल्वे पॅसेंजर गाडीत दोन्ही हातानी रेल्वे दरवाजाचे दांडके पकडुन डब्ब्यात चढता येत होते. आता तीच गाडी बरी होती,असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. या मागणीचा विचार रेल्वे प्रशासन नक्कीच करेल,असे प्रवाशांना वाटत आहे.
रेल्वे ऑफिसला आल्यास माहिती देतो-वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक
पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस चा दर्जा देण्यात आला आहे,त्यासंबंधी बोलण्यासाठी सोलापूर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल.के. रणवेला यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता,त्यांनी ऑफिसला या माहिती देतो,अशी प्रतिक्रया दिली.