PFI संघटनेच्यावतीने केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी विरोधात 23 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली पोलिसांची परवानगी नसताना कार्यकर्त्यांच्या जमावाने या ठिकाणी घोषणाबाजी केली. या सगळ्या दरम्यान या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेला या आशयाचे वृत्त अनेक माध्यमांनी प्रकाशित केले. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. पोलिस यंत्रणेकडून अध्याप या प्रकरणात स्पष्टता देण्यात आलेली नाही तपास सुरू असल्याचे पोलिस यंत्रणेकडून सांगितले जात आहे. आंदोलनादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी अशा पद्धतीच्या कुठलाही घोषणा दिल्या गेल्या नसल्याचं सांगितलं आहे. तर आगामी निवडणुका लक्षात घेऊन हेतुपुरस्कर या प्रकरणाला राजकीय स्वरूप काही लोक जाणीवपूर्वक देत असल्याचा या नागरिकांचं म्हणणं आहे. काही माध्यम सुद्धा यात सहभागी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...