पंढरपूरचा विठ्ठल हा बुध्दच..

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार असून तेथील खांबांवर बुद्ध वचने कोरलेली आहेत. त्यामुळेच लोकात जनजागृती करण्यासाठी आम्ही भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी धम्म यात्रा काढली आहे,असे या धम्म यात्रेचे आयोजक भंते ज्ञानज्योती महास्थविर यांनी सांगितले, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट..

Update: 2022-07-09 14:50 GMT

 पंढरपूर शहराला प्राचीन काळापासून इतिहास असून या शहराचे नाव 'पुंढरिक' असे होते. "जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा वसवले पंढरपूर" असे संत तुकाराम महाराज सांगतात. पंढरपूर शहर पुंढरिक महाधम्मरक्षित नावाच्या अर्हद भिक्षूनी ही नगरी वसवलेली आहे. पूर्वीच्या काळी पंढरपूर बौध्द भिक्षू निर्माण करण्याचे केंद्र होते. येथून देशभरात भिक्षू धम्माच्या प्रचारासाठी जात असत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला विहाराकडे येत असत. बौध्द भिक्षू सुमारे चार महिने विहारात राहत असत. याच दरम्यान गावोगावचे लोक येथे येवून पंढरपुरातील भिक्षूंना वर्षावासानिमित्त आपल्या गावात घेऊन जात. त्यांच्याकडून ज्ञान घेत. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती ही भगवान गौतम बुद्धांची असून तसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुण्यातील देहू रोड येथे 1954 साली गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करताना सांगितले होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार असून तेथील खांबांवर बुद्ध वचणे कोरलेली आहेत. त्यामुळेच लोकात जनजागृती करण्यासाठी आम्ही भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी धम्म यात्रा काढली आहे,असे या धम्म यात्रेचे आयोजक भंते ज्ञानज्योती महास्थविर यांनी सांगितले. या यात्रेचा समारोप विठ्ठल मंदिराच्या बाहेर बुद्ध वंदना घेऊन करण्यात येणार आहे.





 


आषाढी पौर्णिमेच्या दिवशी प्राचीन काळी लोक पंढरपुरातून गावात भिक्षू घेऊन जायचे

भंते ज्ञानज्योती महास्थविर यांनी बोलताना सांगितले,की आषाढी पौर्णिमेला महाराष्ट्रातील लोक पंढरपूरला येवून आपल्या गावात वर्षावासानिमित्त बौद्ध भिक्षू घेऊन जायचे. त्यांना आपल्या गावात तीन ते चार महिने पावसाळा संपेपर्यंत ठेवत असत. आपल्या गावात नगरात ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला भिक्षूंना पंढरपूरला आणून सोडत. या कार्तिक पौर्णिमेच्या कार्यक्रमाला कठीण दान वर्षावास समारंभ महाप्रवर्णा दिवस म्हणून मान्यता होती. त्याकाळी कार्तिक पौर्णिमेला पूर्ण महाराष्ट्रातील लोक पंढरपुरात येत असत. एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम पंढरपूरला होत असे. पुढे प्रतीक्रांती झाल्यानंतर लोक सर्व विसरून गेले. पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्षू मध्य प्रदेशातील नाकव्दारला रहायचे. येथून ही लोक पंढरपूरला येत असत. याठिकाणी संत ज्ञानेश्वर यांचे वडील निवृत्तीनाथ महाराज राहत होते. त्यांच्या गळ्यात 108 मण्याची माळे होती. या माळेचे मनी मोजून ते म्हणत असे,की 'मी जातो धम्म नगरी बुद्ध दर्शनाची आस '. पंढरपुरातील बौद्ध भिक्षू धम्माच्या प्रचारासाठी देशभरात जात असत. त्यामुळे देशभरातील लोक याठिकाणी येत असल्याचे दिसतात. कर्नाटक,आंध्र प्रदेश,तामिळनाडू आदी ठिकाणचे लोक प्राचीन काळापासून याठिकाणी येत आहेत.




 


विठ्ठल शब्द हा पाली भाषेतील शब्द

भंते सांगतात,की विठ्ठल हा शब्द पाली भाषेतील आहे. त्याकाळी पंढरपूर हे मोठे वैभव केंद्र होते. त्यामुळे काहीतरी उद्देशपूर्ती घेऊन लोक याठिकाणी येत असत. लोक सध्या पांडुरंगाचे दर्शन घेतात,पण ते अध्यात्माचे असते. त्यांना विठ्ठलाची मूर्ती ही बुद्ध मूर्ती असल्याचे माहीत नाही. तुकारामांनी सांगितले आहे,की अध्यात्माला अतर्मुख होवून पहायला हवं. धार्मिक भजने ही सर्व संतांच्या गाथामधून दिसून दिसून येते. या गाथा धम्म पिटकातून घेण्यात आल्या आहेत. ते बुद्धांचे विचार आहेत. त्यामुळे साधू संतांनी सांगितलेल्या गाथाचा अर्थ योग्य प्रकारे समजावून घेतला पाहिजे.

येणाऱ्या काळात सर्वजण बौद्ध धम्म स्वीकारतील

वारकऱ्यांनी रागावर, द्वेषावर आणि मोहावर विजय मिळवावा. चित्त शांत करावे. त्यामुळेच माणूस माणसाशी माणसासारखे वागायला लागेल. आपली हानी होणार नाही आणि इतरांची हानी होऊ देणार नाही. आपला ही लाभ होईल आणि इतरांचाही लाभ होईल असे वर्तन करेल. तुटलेली मने जुळतील ही तत्वे घेऊन आम्ही सामाजिक क्रांतीचे अभियान घेऊन पंढरपूरला निघालो आहेत. या ठिकाणी माणसे जोडण्यासाठी चाललो आहोत. हे संपूर्ण अभियान पुढे धर्मांतराच्या दिशेने त्सुनामीच्या जशा लाटा निर्माण झाल्या होत्या त्या प्रमाणे या देशातील तेली, माळी,कोळी आदिवासी आणि सर्व ब्राम्हणेतर समाज बौद्ध धम्मात सहभागी होऊन बौद्ध धम्म स्वीकारेल.




 



पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार असून तेथील खांबांवर बुद्ध वचने कोरलेली आहेत. त्यामुळेच लोकात जनजागृती करण्यासाठी आम्ही भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी धम्म यात्रा काढली आहे,असे या धम्म यात्रेचे आयोजक भंते ज्ञानज्योती महास्थविर यांनी सांगितले, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट..

आषाढी पौर्णिमेला अशाळ हो असे म्हणतात. बुद्ध जेव्हा जेव्हा उत्पन्न होतात. तेव्हा तेंव्हा बुद्धांच्या जन्माची कहाणी सुरू होते. आषाढी पौर्णिमेला बुद्ध आपल्या मातेच्या कुशीत प्रवेश करतात. जेव्हा दहा महिन्याचा गर्भ असतो त्या दिवशी हीच आषाढी पौर्णिमा असते. जेव्हा बुद्ध वयाच्या 29 व्या वर्षी घर सोडतात तेव्हा हेच बौध्दीसत्व महानिष्क्रमन करतात. ते याच आषाढी पौर्णिमेला करतात. तिसरी घटना म्हणजे बुद्धत्वत प्राप्त झाल्यानंतर याच पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तित करतात. याच पौर्णिमेला भिक्षू संघाची उत्पती होते आणि पाचवी घटना म्हणजे याच पौर्णिमेला वर्षावासासप्रारंभ होतो. म्हणूनच या पौर्णिमेला विशेष असे महत्व आहे.


Full View

Tags:    

Similar News