इंग्रजीचं अवडंबर

Update: 2019-06-01 11:29 GMT

आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांनी इंग्रजीचं अवडंबर माजवलं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या आर्थिकदृष्ट्या प्रगत लोकांनी इंग्रजी आत्मसात केली. भारतात केवळ 15 टक्के लोकच इंग्रजी बोलतात, जे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या वर्गाचे लोक आहेत. हे आर्थिकदृष्ट्या अभिजात लोक ते ज्या क्षेत्रात काम करतात. त्या क्षेत्रात इंग्रजीचा वापर प्रवेश परिक्षेसारखा करतात. आर्थिकदृष्ट्या अभिजात वर्गात सामिल होण्यासाठी इंग्रजी हा निकष मानला जात आहे. हा अभिजात वर्ग इंग्रजी ला सुशिक्षित असण्याच्या परिमाणाच्या स्वरूपात पाहतो. या लोकांनी ज्या ठिकाणी इंग्रजीची गरज नाही अशा ठिकाणीही ही प्रवेशासाठी इंग्रजीची अट निर्माण करून ठेवलीय. या दुखःद स्थिती आणि दृष्टीकोनामुळे सर्व समाजाला भाषेच्या आधारावर वंचित केलं आहे. यामुळे सामान्य लोकं उच्च उत्पन्नाची कामे तसंच उच्च सामाजिक-आर्थिक स्तरापासून वंचित राहिली आहेत.

अभिजात वर्गाच्या या धोरणांमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना अभिजात वर्गाचा हिस्सा बनण्यापासून तसंच उच्च उत्पन्नाच्या रोजगारापासून दूर ठेवलं आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांमध्ये मेहनती, ज्ञानी, कौशल्य असलेले चांगले शिक्षित लोक नसतात असं काही नाहीय, फक्त त्यांना इंग्रजी राज आणि सध्याच्या अभिजात वर्गाची इंग्रजी भाषा येत नाही. या संपूर्ण स्थिती मुळे भारतातल्या पालकांनी एका कृत्रिम आकांक्षेमागे धावत आपापल्या पाल्यांना इंग्रजी भाषा बोलण्यास-शिकण्यास भाग पाडलं जी त्यांची भाषा नाहीय.

जर आम्हाला खरोखरच समाज, शिक्षण आणि रोजगार या मध्ये समानता स्थापन करायची असेल तर आपण लवकरात लवकर या इंग्रजी सत्तेला संपूर्ण देशात रोखलं पाहिजे. यासाठी प्रामुख्याने शिकलेल्या अभिजात वर्गानेच प्रयत्न करायला हवेत. लोकांना रोजगार देताना, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, शालेय संस्थांमध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये जर स्थानिक भाषांचा वापर वाढवला पाहिजे. मागील काही वर्षांपासून भारतीय भाषांनी आपलं महत्व आणि सन्मान गमावला आहे, तो त्यांना परत मिळाला पाहिजे. संपूर्ण देशभरात शाळा आणि महाविद्यालयात भाषा शिक्षणासाठी पदं तयार केली गेली पाहिजेत, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या स्तरातील लोक-समुदाय आपापसात जोडले जाऊ शकतील.

हे खरं आहे की लहान मुलांमध्ये भाषा शिकण्याची क्षमता असते. हे ही खरंय की आपल्याला इंग्रजीची सत्ता रोखून अभिजात वर्ग आणि इतर समाजातील दरी दूर केली पाहिजे, पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या सरकार आणि बिगर सरकारी शाळांमध्ये भारतीय भाषांसोबतच इंग्रजी भाषेचे अतिशय उच्चप्रतीचं शिक्षण दिलं पाहिजे. मुलं रोजच्या जिवनात इंग्रजीचा वापर करू शकतील तसंच प्रवाही बोलू शकतील यावर आपला भर असला पाहिजे. याच बरोबर शिक्षणाचं माध्यम तसंच भारतीय संदर्भात संस्कृती, कला आणि साहित्याच्या अभ्यासासाठी आपल्याला आपल्या भारतीय भाषांचाच वापर वाढवला पाहिजे.

आपल्याला माहितीच आहे, 1960 मध्ये बोललं जायचं की, इंग्रजी विश्वभाषा बनेल म्हणून, पण असं काही झालं नाही. जसं आधी म्हटलं गेलंय की जगातील सर्व विकसित देश आपापल्या भाषांचाच वापर करतात तसंच भारताने ही करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. व्यवहार तसंच शिक्षणाची भाषा आपली असावी, नाहीतर आपल्या भाषांचा समृद्धता, इतिहास, वारसा आणि विविधता संपुष्टात येईल.

जगभरात इंग्रजी काही क्षेत्रांमध्ये एक कॉमन भाषा मानली जाते यात संशय नाहीय. खासकरून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात.. आज अव्वल दर्जाचे वैज्ञानिक जर्नल इंग्रजीतच प्रकाशित होतात. त्यामुळे ज्यांना उच्च शिक्षण घेऊन अशा क्षेत्रांमध्ये काम करायचं असेल त्यांना भारतीय आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पारंगत व्हावं लागेल. त्यासाठी त्यांना दोन्ही भाषा शिकाव्याच लागतील. जसं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या अनेक देशांमध्ये होतं.

(( नवीन शैक्षणिक धोरणातून... ))

Similar News