कांद्यामुळे डोळ्यातून येणारे पाणी बंद करणारा 'स्मार्ट चाकू'
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यांची आग होते हा तसा प्रत्येक गृहिणीचा अनुभव....पण आता बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सातवीत शिकणाऱ्या मुलाने यावर उपाय शोधून काढला आहे.;
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यांची आग होते हा तसा प्रत्येक गृहिणीचा अनुभव....पण असा चाकू मिळाला की ज्याने कांदा कापला तर डोळ्यात पाणी येणार नाही आणि डोळ्यांची आगही होणार नाही...अशक्य वाटते ना...पण हे प्रत्यक्षात घडले आहे...आणि असा स्मार्ट चाकू तयार केला आहे सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने....
बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विज्ञानाचे धडे गिरणारा ओमकार शिंदे याने हा खास स्मार्ट चाकू तयार केला आहे. आई कांदा चिरत असताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओमकारने पाहिले आणि कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणार नाही, यासाठी काय करता येईल, याची चाचपणी त्याने केली आणि सात दिवसात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा चाकू बनवला. ओमकारच्या या प्रयोगाची दखल राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेतही घेतली गेल्याचे त्यांच्या शिक्षकांनी सांगितले आहे.
ओमकारचे आई वडील हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्याला शिकता आलं नाही म्हणून, हे दोघे शेतात राबून ओमकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. मुलाच्य़ा या कामगिरीने आपल्या मेहनतीचा फायदा होतो आहे, असे त्यांना वाटते आहे. ओमकारच्या या प्रयोगाची चर्चा आता होते आहे. त्याच्या या प्रयोगाची दखल तज्ज्ञांनी घेतली आणि त्यावर आणखी संशोधन झाले तर घराघरात त्याचा हा स्मार्ट चाकू नक्कीच गृहिणींच्या डोळ्यात येणारे पाणी रोखू शकले....