दर वाढल्यावर तुम्हाला कांदा रडवतो पण दर पडल्यावर आमची जिंदगीच सडवतो. पण या आमच्या दुःखाच घेणं देण तुम्हाला आहे ना या कठोर सरकारला. बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी गावातील नामदेव आणि मनीषा लटपटे या शेतकरी दांपत्याने तीन एकर शेतात कांदा लागवड केली होती. शेताची मेहनत, बियाणे खुरपणी खते यासाठी एक लाख रुपये खर्च केले.कांदा विकण्याची वेळ आली. गाडीभाडे खर्च वजा होऊन हातात आला फक्त एक रुपया. या एक रुपयात जगायचं कसं घर चालवायचं कसं ? ही चिंता या दोघांना सतावतेय..... पहा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा ग्राउंड रिपोर्ट