हुकूमशाहांना लोकांच्या हसण्याची भीती का वाटते?

तुमच्या हसण्यावर सरकारने बंदी घातली तर? गंमत वाटली ना....पण हे खरं आहे....उ. कोरियामध्ये दिवंगत नेत्याच्या स्मृतीदिनी १० दिवस हसण्यावर, शॉपिंगवर बंदी घालण्यात आली आहे. हुकुमशाहांना लोकांच्या हसण्यावर आक्षेप का असतो, याचा आढावा घेणारा रिपोर्ट....

Update: 2021-12-17 13:30 GMT

देशात लोकशाहीचा अतिरेक होतोय त्यामुळे एखादा हुकूमशाह पाहिजे....सारे व्यवस्थित करायचे असेल तर हुकूमशाही हवीच अशी मतं अनेकजण तावातावाने मांडत असतात....पण हुकुमशाही असली तर काय होते, नागरिकांना काय भोगावे लागते हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत....

आता तुम्ही विचार करत असाल की हुकूमशाही आणि या स्माईलिंचा संबंध काय....थांबा सांगतो....कोणत्याही देशाच्या सर्वोच्च नेत्याची पुण्यतिथी ही त्या देशात पाळली जाणे स्वाभिविक आहे...पण तुम्हाला माहिती आहे का...एका देशात त्यांच्या नेत्याच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त १० दिवस हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे....




 


उ.कोरिआचे माजी हुरूमशाह किंम जोंग दुसरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनी देशात १० दिवस हसण्यावर, शॉपिंगवर, दारु पिण्यावर आणि एवढेच नाही तर विरंगुळ्याच्या कोणत्याही गोष्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे....तिथल्याच एका नागरिकांने माध्यमांना ही माहिती दिली आहे....या निर्बंधांचे उल्लंघन केले तर गंभीर शिक्षा होईल असाही इशारा देण्यात आला आहे. सर्वोच्च नेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त १० दिवस शोक असताना कुणी मेले तर त्यांच्यावर अंत्यसंस्कारही कऱता येणार नाहीत...

हा निर्णय अर्थातच उ. कोरिआचा विक्षिप्त हुकूमशाह किम जोंग ऊन याने घेतला आहे....त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत....पण आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनी १० दिवसांचा शोक आणि त्यातही हसण्यावर बंदी घालण्याचा निर्णय म्हणजेच हुकूमशाही काय असते याचे उदाहऱणच त्याने जगाला घालून दिले आहे.

यानिमित्ताने प्रश्न निर्माण होतो तो हुकूमशाह हसण्याला का घाबरतो याचा....बरं हुकूमशाहच हसण्याला घाबरतात का तर नाही असे नाही, भारतासारख्या लोकशाही राष्ट्रातही पंतप्रधान मोदी यांच्या युटूयूब चॅनेलवर अनलाईक करत अनेकांनी स्माईली टाकली आणि आपला राग व्यक्त केल्याने तेथील कॉमेंटचा ऑप्शन बंद करण्यात आला होता. अजूनही PMO च्या युट्यूब चॅनेलवर कॉमेंटचा पर्याय लॉक आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याही पोस्टवर लोक स्माईली टाकून कॉमेंट करत होतो, फडणवीस यांनीही याविरोधात पोलीस तक्रार केली होती.



 


मुळात हसणे हा मानवाचा नैसर्गिक अधिकार आहे.....एखाद्याला हसणं बंद ठेव कसे सांगितले जाऊ शकते....तसेच ज्या स्माईली आता सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे माध्यम आहेत, त्यांचा त्रास कसा होऊ शकतो, असाही प्रश्न आहे....मुळात स्माईलची भीता का वाटते हा प्रश्न आहे. त्यामुळेच उ.कोरियाचा हुकूमशाह किम जाँग उन यालाही देशात १० दिवस हसण्यावर बंदी का घालावीशी वाटली, सामान्य नागरिकांच्या जीवनावर एखाद्या हुकूमशाहाला एवढा गंभीर अधिकार गाजवता येतो का, सामान्यांनी काय खावे, काय प्यावे हे हुकूमशाह ठरवणार असेल तर जगण्याचा नैसर्गिक अधिकारच हिरावून घेतला जातो आहे. त्यामुळेच किम जाँग दुसरे यांना स्मृतीदिनिमित्त अभिवादन करत असलो तरी हसण्याचा अधिकार मात्र आम्ही राखून ठेवत आहोत....

Tags:    

Similar News