कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि ठाण्यात राहणाऱ्या 45 लाख लोकांना पिण्याचे पाणी देणारी उल्हास नदी मरण यातना सोसते आहे. उल्हासनगर भागात तर ही नदी जलपर्णीमध्ये हरवली आहे. ही जलपर्णी काढून उल्हास नदीला वाचवण्यासाठी मनसेचे नितीन निकम यांनी पुन्हा एकदा नदीतच उपोषणाला सुरूवात केली आहे.
याआधी निकम यांनी असेच आंदोलन केले होते. त्यानंतर या भागातील एका नाल्यातून थेट नदीत येणारे सांडपाणी बंद करण्यात आले होते. पण आता नदीत जोपर्यंत सांडपाणी सोडणे बंद होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे नितीन निकम यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....