#GroundReport Nanar : कोकणातील मच्छिमारांचा रिफायनरीला विरोध का?
नाणार इथला रिफायनरी प्रकल्प रद्द केला गेला आहे. पण या प्रकल्पाला कोकणात विरोध का होतो आहे, हे दाखणारा आमचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
"माझा मुलगा गेल्या २ वर्षांपासून नोकरीच्या शोधात आहे, नोकरी न मिळाल्यामुळे आम्ही आमचा पारंपरिक व्यवसाय करतोय. नोकरी नसल्याने तो व्यवसाय तरी करतोय, पण अशा रिफायनरी प्रकल्पामुळे व्यवसायच नसेल तर आम्ही काय करू " असा सवाल उपस्थित केला आहे नरेश सागवेकर यांनी.....सागवेकर हे गेल्या ४० वर्षांपासून मासेमारी व्यवसाय करत आहेत. कोकणात शेतीसोबत मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील बहुतांश अर्थव्यवस्था मासेमारीवर अवलंबून आहे. कोकणचा भौगोलिक विचार केला तर एका बाजूला डोंगराळ, खडकाळ प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला सागरी किनारा... इथल्या स्थानिकांची उपजीविका पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे. रिफायनरी प्रकल्पांमुळे नजीकच्या गावांवर परिणाम होणार असून मासेमारी व्यवसाय नष्ट होण्याची भीती इथल्या स्थानिकांना वाटतेय. पाहा नाणारहून तेजस बोरघरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
रिपोर्ट,शूट/ एडिट - तेजस बोरघरे
Report,Shoot / Edit - Tejas Borghare https://youtu.be/dFwWM0NL3Ug