हिंदू-मुस्लिम होणं सोपं पण माणूस होणं कठीण, शेतकरी आंदोलनात एकतेचा संदेश....
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आता हे आंदोलन एकात्मतेचे प्रतीक म्हणूनही उभे राहत आहे. पाहा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.....;
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी एकत्र जमलेले आहेत. त्यांचा मुक्काम तिथेच आहे. या शेतकऱ्यांसाठी इथेच रोज लंगर होत आहे. या लंगरमध्ये हजारो शेतकरी रोज जेवत आहेत.
हे लंगर मुस्लिम बांधवांमार्फत आयोजित करण्यात आले आहे. इथे कुणाचाही धर्म किंवा जात विचारली जात नाही. इथे येणाऱ्या प्रत्येकाला जेवण दिलं जात आहेत. यासंदर्भात डॉ. नसीर अख्तर सांगतात की ते केवळ शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी ३०० किलोमीटरवरुन आले आहेत.
"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आम्ही केवळ माणुसकी म्हणून इथे आलो आहोत. हिदू-मुस्लिम होणे सोपे आहे पण माणूस होणे कठीण आहे, याच माणुसकीची साक्ष आम्ही देत आहोत कारण राजकारण कऱणाऱ्यांना राजकारण करुन द्या आम्ही माणसांसाठी लढत आहोत.
त्यामुळे सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही असे ते सांगत आहे. हे आंदोलन आता मानवतेचे आंदोलन झाले आहे. यामध्ये सर्व जाती आणि धर्मांचे शेतकरी आणि इतर लोक सहभागी होत आहेत, याचा विचार सरकारे करण्याची गरज आहे, असे अख्रतर यांनी सांगितले आहे.