परीक्षा काळात तरी बस सुविधा चालू करा

Update: 2022-02-27 13:27 GMT

गेल्या काही दिवसापासून ST कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे याचं संपामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे तर दुसरीकडे येणाऱ्या काही दिवसातच दहावी व बारावीच्या परीक्षा होणार आहेत त्यामुळे परीक्षा काळात तरी शासन विद्यार्थ्यांना बस सुविधा चालू करतोय का नाही जर बस सुविधा चालू नाही झाल्या तर विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार तर दुसरीकडे बस सुविधा चालू कराव्यात अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांनी केली आहे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट....

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे परंतु त्यांच्या त्या न्याय्य मागण्या आहेत मात्र त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. एसटी बंद असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या कारणामुळे विद्यार्थ्यांना त्याला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही शिकलात तर तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाची गावाची जिल्ह्याची व राज्याची देशाची प्रगती करू शकता.

गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यासह राज्यामध्ये एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जो संप पुकारलेला आहे त्या संपामुळे अनेक सर्वसामान्य लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे आजही ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांची लालपरी म्हणून ओळखली जाणारी बस गेल्या तीन महिन्यापासून गावामध्ये पोहोचलीच नाही त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा मोठा खोळंबा झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ग्रामीण भागातील महिला, वयोवृद्ध, शाळकरी मुलं,मुली आहेत अशा ग्रामीण भागातील खाजगी प्रवासी वाहतूकीने जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे एसटी सुविधा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलींना शाळेमध्ये सुद्धा पाठवत नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर ग्रामीण भागात बस सुविधा चालू झाली नाही तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागणार आहे तसेच बस सुविधा चालू करा अशीच सर्वसामान्यतून मागणी होत आहे.





 


मात्र या शासनाचे शिक्षण सोडून इतरत्र सर्व गोष्टीवर लक्ष आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून धोरणाच्या नावाखाली शाळा बंद आहेत. मात्र बार सुरू आहेत शासन ऐन वेळी निर्णय घेतला की परीक्षा ऑफलाईन घ्यायचेत. ऐन वेळी पुन्हा शासन निर्णय घेतो की परीक्षा ऑनलाईन घ्यायचा त्यामध्ये विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहे . पालकांनी समजत नाही की आपण काय करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे की दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्यामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत .त्याच्यामध्ये बस सेवा बंद आहे.

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. एक तारखेला दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती चालली. त्याच्यामध्ये त्यांना जे ज्ञान अवगत व्हायला हवं होतं ते झालेलं नाही. शासनाने त्यांच्या मानसिकतेचा विचार न करता त्यांना या परीक्षेला सामोरे जायचा आहे. त्यांनी जायचं कशाने हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उभा आहे. मी आपल्या चैनल च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची शिक्षणाबाबत ची जी काही अडचण आहे शिक्षणा बाबतचा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा होत असलेला खोळंबा त्यावर तात्काळ निर्णय घेऊन लवकरात लवकर एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचे जा काय समस्या आहे. त्याला लवकरात लवकर एसटी बस सुरू करून विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी शासनाने लवकरात लवकर सोडवाव्यात असं पालक मुकुंद सोपान गोरे यांनी सांगितलं.

शासनाला एकच नम्रतेची विनंती आहे की लवकरात लवकर बस चालू कराव्यात कुस्ती कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य करून किंवा आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी आम्ही ऑनलाइन शिक्षणामुळे आम्ही अगदी परफेक्ट झालेलो नाही मात्र परीक्षा ऑफलाइन होत असल्याने आमचा जाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामुळे शासनाने आम्हाला बस सुविधा लवकरात लवकर चालू करून द्यावी कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाइन यामुळे आमचा अभ्यास झालेला नाही आणि मानसिक टेन्शन मध्ये आहोत आता नेमकं काय करावं काय नाही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, असे विद्यार्थींनी सांगितले.

आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थी आहोत आम्ही शहरी भागात असतो तर पाच रुपये देऊन रिक्षा उपलब्ध होत आहे. मात्र आम्हाला जाण्यासाठी कधी गाडी असते तर कधी दुसऱ्याची मोटर सायकल घेऊन गेलं तर शंभर दोनशे रुपयाचे पेट्रोल टाकावे लागते. त्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. रिक्षाची वाट आम्हाला एक तास पहावी लागत आहे. परीक्षा दहा वाजता असेल आणि अकरा वाजता जर रिक्षा पोहोचला तर आणि परीक्षा द्यायची कशी.... असे प्रशांत डोरले म्हणाले.

गेल्या दोन वर्षापासून या सरकारने शिक्षणाची वाट लावली आहे. कधी कॉलेज चालू करायचे कधी कधी मध्ये बंद करायचे .कधी सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा चालू करायचे धोरणाच्या नावाखाली ऑनलाईन शिक्षण चालू करायचे. ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल असणे गरजेचे असतो .आमच्या खेड्यामध्ये जर लाईटच नसेल आणि त्या ठिकाणी जर रेंज नसेल आम्ही शिकायचं कुठं. त्यातच तुमच्या परीक्षा कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन तर कधी ऑनलाईन पेपरची माहिती सांगायची. दोन दिवसानंतर पुन्हा ऑफलाईन ची नोटीस काढायची त्यामध्ये तुमची बस सेवा बंद आहे. जर सकाळच्या पेपरला विद्यार्थी दुपारी पोहोचला तर विद्यार्थ्यांनी करायचं काय. त्या बरोबर विद्यार्थ्यांसोबत शिक्षणा बाबतीत तुम्ही हा काय खिलवाड लावला आहे. विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं जर उद्या तुमचा विद्यार्थी उद्याचा सुजाण भारताचा नागरिक आहे. जर त्याच्या आयुष्याशी खेळत असाल तर नको या देशाचं भविष्य काय असेल तसेच विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.




 


काल परवा दिवशी ची बातमी आली की बारावीची परीक्षा ऑफलाईन होत आहे आज पुन्हा सांगितले की बारावीचे पेपर एक महिन्यासाठी पुढे ढकलल्या आहेत काल काहीतरी बारावीच्या पेपरचा साठा घेऊन येणार टेम्पोला आग लागली नेमकं चाललय काय तुमचे येते काही दस्तऐवज घोटाळे उघड होत असताना आतापर्यंत सरकारी कार्यालयात आग लगत होत्या आता जर विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आग लावायचे काम असेल तर कुठेतरी निषेधार्थ आहे या सरकारला विद्यार्थ्यांच्या वतीने स्ट्रिक्ट मागणे आहे की विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा कुठेतरी खेळ मांडू नका परीक्षा घ्यायची असतील तर योग्य रीतीने योग्य वेळी घ्या नाहीतर परीक्षेचा मारा आमच्या बोकांडी करू नका अशी आमची सरकारला विनंती आहे, असं विद्यार्थी म्हणाले.

सरकारची एस टी महामंडळ सुविधा जी आहे ती ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्यांसाठी जीवनदायी ठरलेली आहे या तीन चार महिन्यापासून एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप तो योग्य असेल की अयोग्य आहे ते सरकारने ठरवावं त्या संपाची आमचं दुमत नाही आमच्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी खाजगी बसेस च्या नावाखाली खाजगी बसेस वेळेवर शकत नाही त्याचा आर्थिक भुर्दंडही आम्हाला सोसावा लागत आहे आमचा कुठं तरी पाचशे( 500-1000) हजार रुपये मध्ये वार्षिक पाच निघायचा आणि जर आम्हाला वीस हजार रुपये घालावे लागत असतील तर आम्हाला न शिकून देण्याचे हे षड्यंत्र मानावे लागेल आम्हाला परीक्षा ला जायचे उशीर होतोय आम्ही सरकारला मांडत आहे आमची विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारकडे एकच मागणी मांडत आहोत विद्यार्थ्यांच्या हितासाठी तरी किमान त्यांनी लवकरात लवकर कामगारांचा संपावर योग्य निर्णय घ्यावा किंवा आम्हाला दुसरी पर्यायी व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने मोफत करून द्यावी असं विद्यार्थी प्रकाश धुताडमल म्हणाले.

आज शासनाच्या विरोधात एसटी कर्मचारी संप उभारलेला आहे तो योग्य असेल की अयोग्य असेल परंतु याचा परिणाम मनासारख्या भोगावा लागत आहे .आमच्या माता भगिनी आहेत यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचं छोटासा उदाहरण म्हणजे ग्रामीण भागातील एसटी बंद असल्यामुळे त्यांना शाळेला कॉलेजला जाता येत नाही. मग याच्यावर पर्याय म्हणून काय आज ग्रामीण भागातील पालक आहेत. ते डोक्यामध्ये एकच विचार घेत आहे आपले लेक आपली मुलगी एक मोठी झालेली आहे तिला घरात ठेवणे योग्य नाही. शिक्षणाच्या नावाखाली तरी आपण मुलीला सांभाळू शकतो पण पालक कमी वयामध्ये मुलीचे लग्न करतात शासनाला विनंती करायची आहे. तुम्ही एक अठरा वर्षाच्या नंतर एक नियम काढता की लग्न नाही झाले पाहिजे. त्याचं मुलीचे -मुलांचे शिक्षण नाही. या मानसिक त्रासातून विद्यार्थी आत्महत्या तरी करतात नाहीतर त्या मुलीचे लवकरात लवकर लग्न करून ते उध्वस्त करतात शासनाला विनंती आहे की तुमचे कर्मचाऱ्यांसोबत जो काही लढा असेल किंवा तुमच्या विरोधात जो काही संप पुकारलेला असेल तो योग्य असेल की अयोग्य असेल ग्रामीण भागांमध्ये नाही तर शहरी भागांमध्ये सुद्धा जनता ग्रामीण भागात ऍडमिशन आहेत.

त्यांना जो पर्याय असतो एसटी ने जाण्यासाठी जे पास उपलब्ध केलेले असतात व ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलीला पास उपलब्ध करून देतात. आपल्या मुलीला एसटी महामंडळावर पालकांचा एक विश्वास असतो. जी आपली मुलगी एसटीने प्रवास करते खरोखरच सुखरूप जाणार आहे आणि प्रायव्हेट गाडी ने जे आपली मुलगी जाणार आहे ती सुरक्षित नाही त्यामध्ये मुलीला कुठेतरी धोका होऊ शकतो त्यामुळे पालक आपल्या मुलीला शाळेत पाठवायला घाबरतात मी अशी एक शासनाला विनंती करतो की जे काय असेल तुम्ही पहा परंतु या विद्यार्थ्यासोबत व विद्यार्थ्यांच्या जिवनासोबत खिलवाड करू नका विनंती आहे की कमीत कमी या परीक्षा होईपर्यंत तरी एस टी महामंडळ चालू करा.

आता काही दिवसातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहे तुम्ही शासनाने परीक्षा पुरता तरी काही तरी असा निर्णय घ्यावा की विद्यार्थ्यांना परीक्षेत केंद्रावर वेळेवर पोहोचता येईल अशी व्यवस्था करावी अशी आमची विनंती पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. शासनाने वारंवार आवाहन करुनही प्रत्यक्षात राज्यातील अनेक मार्गांवर एसटी सुरू झाल्याचे दिसत नाही. दोन फेऱ्यांमध्ये तास-दोन तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. साध्या बससेवेच्या तुलनेत वातानुकूलित खासगी शिवशाही-शिवनेरीच्या गाड्या धावताना दिसत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवासी खासगी बस, वडाप-मॅक्सिकॅब, काळी-पिवळी जीप अशा पर्यायी आणि अनधिकृत गाड्यांतून प्रवास करत आहेत.




 


एसटी संपापूर्वी राज्यात ९४ हजारांहून अधिक एसटी फेऱ्या सुरू होत्या. मात्र संपामुळे सध्या ९ हजार ६३६ फेऱ्या सुरू आहेत. त्याचबरोबर २४९ आगार अंशतः सुरू करण्यात आले आहेत, असे महामंडळाने म्हटले आहे. परीक्षाकाळात विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहावी तसेच, करोना नियंत्रणात आल्याने राज्यातील नागरिकांची प्रवासासाठी वाढलेली मागणी पाहता महामंडळात खासगी चालकांची नियुक्ती करण्यात येत आहे. जानेवारीमध्ये खासगी चालकांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू करून १२२५ खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीची गरज लक्षात घेऊन त्याचा आढावा घेतल्यानंतर आणखी खासगी चालकांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाच्या जनसंपर्क अधिकारी राजेश शेलार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागामध्ये एकूण आठ आगार आहेत या आगाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक केली जाते जिल्ह्यातील आठ ही हजार सुरळीत चालू आहेत 102 बसेस सध्या चालू आहेत त्या पुणे, औरंगाबाद, लातूर, परभणी, जालना व सर्वच जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्यातून बस सुविधा चालू आहे व ग्रामीण भागातही काही बसेस सोडण्यात येत आहेत आपली प्रवासी वाहतूक दैनंदिन 12 हजार इतकी आहे यामध्ये प्रवाशांची सात आपल्याला चांगली मिळत आहे मी आपल्या माध्यमातून जे कर्मचारी गैरहजर आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी कामावर रुजू व्हावे असे मी त्यांना आव्हान करतो, असे बाईट व्यवस्थापक म.रा.प.म बीड मोरे यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News