ध्येयवेडा अवलीया जागेअभावी स्मशानभुमीत करतोय मनोरुग्णांची सेवा...
कोविड नंतरच्या काळात दिवसेंदिवस मनोरुग्णांची संख्या वाढत चालली असून अशा या मनोरुग्णांना घरातील लोक आधार देत नाहीत. त्यांच्याजवळ जाण्यास कुटुंबातील लोक घाबरतात. अशा या रुग्णांवर योग्यप्रकारेचे औषध उपचार केले जात नाहीत. परिणामी असे हे मनोरुग्ण वाट मिळेल तिकडे चालत राहतात घरादारापासून हजारो किलोमीटर हे मनोरुग्ण भटकत राहतात. यांना आधार देण्याचे काम कोणीच करत नाही. पण सोलापूर शहरातील एक युवक अशा लोकांना आधार देण्याचे काम ध्येयवेडा तरुण अतिश लक्ष्मण शिरसट असून जागेअभावी त्याने स्मशानभुमीचा सहारा घेत मनोरुग्णांची सेवा करण्याचे काम सुरु ठेवले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट....
सोलापूर : सध्याचे जग हे धक्काधक्कीचे मानले जाते. या युगात मानव घड्याळाच्या काट्यावर चालत असून वेळेला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाची प्रगती जरी झाली असली तरी त्यामुळे अनेक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. विकसनशील देशात तर या समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. या देशात महागाई,बेरोजगारी,शैक्षिणक समस्या,धार्मिक समस्या आदी प्रकारच्या समस्यानी लोक हैराण झाले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्र काट्यावर चालत असून येथे वेळेला फारच महत्त्व दिले जाते.
त्यामुळे या क्षेत्रातील लोकांत प्रचंड ताणतणाव असल्याचे सांगितले जाते. वाढत्या महागाईमुळे लोक हैराण झाले असून कुटुंब कर्त्यांवर मानसिक दबाव वाढत चालला आहे. बेरोजगारीमुळे तरुण वर्ग नैराश्यच्या गर्तेत सापडला आहे. तर शेतकरी वर्ग ही अडचणीत आला असल्याचे दिसून येते. सातत्याने लोकांच्या समस्यात वाढ होत चालल्याने अनेकांना नैराश्य येवून काहीजणांनी आत्महत्या ही केल्या आहेत तर काही जण मनोरुग्ण झाले आहेत. याला विविध प्रकारची कारणे जबाबदार असल्याचे सांगण्यात येते.
दिवसेंदिवस मनोरुग्णांची संख्या वाढत चालली असून अशा या मनोरुग्णांना घरातील लोक आधार देत नाहीत. त्यांच्याजवळ जाण्यास कुटुंबातील लोक घाबरतात. अशा या रुग्णांवर योग्यप्रकारेचे औषध उपचार केले जात नाहीत. परिणामी असे हे मनोरुग्ण वाट मिळेल तिकडे चालत राहतात. ते निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होवून जीवन जगत राहतात. घरादारापासून हजारो किलोमीटर हे मनोरुग्ण भटकत राहतात. यांना आधार देण्याचे काम कोणीच करत नाही. पण सोलापूर शहरातील एक युवक अशा लोकांना आधार देण्याचे काम करत असून त्याचे नाव अतिश लक्ष्मण शिरसट असून जागेअभावी स्मशानभुमीचा सहारा घेत मनोरुग्णांची सेवा करण्याचे काम करत आहे. त्याच्या या कार्याची दखल घेवून त्याला अनेक सामाजिक संस्थांनी पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
मनोरुग्णांच्या सेवेसाठी चक्क स्मशानभूमीचा केला जातोय वापर
एकविसाव्या शतकात आपण आधुनिक जीवनशैली अमलात आणत असताना माणसं मात्र व्यापक होण्याऐवजी खुजी होत चालली आहेत. संगणक,मोबाईल आणि माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सारं जग जवळ येत असताना आपण आतून एकमेकांपासून दूरावत चाललो असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा प्रसंगी सोलापूर शहरात,बेवारस मनोरुग्णांसाठी वृद्ध लोकांसाठी कार्यरत असणारा आतिश कविता लक्ष्मण हा तरुण जागेअभावी मनोरुग्णांची सेवा स्मशान भूमीत करतोय. आंघोळ घालणे असो की त्यांची मलमपट्टी,दाढी,कटिंग,मलमुत्र
स्वच्छता तो निस्वार्थ भावनेने गेली चार पाच वर्षांपासून करत आहे. आजपर्यंत सोलापूर शहरातून त्यांनी 250 मनोरुग्णांच पुनर्वसन केल असून 150 हुन अधिक मनोरुग्णांवर उपचार,कपडे,दाढी केस तसेच त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था आतिशने आतापर्यंत केली आहे. आतिश हा इतरांपेक्षा वेगळा वाटतो. स्वत:च्या व्यक्तिगत सुख दु:खांपलीकडे जाऊन रस्त्यांवर भेटणाऱ्या,ज्यांना स्वत:चे कसलेच भान नाहीय,अशा मनोरुग्णांसाठी तो सतत कार्यरत राहतो,त्यांची स्वच्छता करतो,त्यांच्या केसांच्या जटा काढतो व कित्येक महिने अंघोळ न केलेल्या शरीरावरील जखमा स्वत: स्वच्छ करतो,त्यांना पोटापाण्याची व्यवस्था पाहतो.
आपल्या मित्रपरिवाराच्या आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सहाय्याने त्यांचा पत्ता शोधून त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचा प्रयत्नही आतिश स्वत करत असतो. काचेच्या चकचकीत इमारतीत राहून समाजसेवेचे इव्हेंट करणाऱ्या समाजसेवाकांपेक्षा आतिश वेगळा आहे. तो जसा दिसतो,बोलतो तसाच तो आहे, त्याचं आत एक बाहेर आणि एक असं काहीच नाहीय. त्याला मिरवायची हौस नाही,की कुणाच्या सत्कारानं तो वाहवून गेला,असे कधीही झाले नाही. स्वत:च्या कामाचं वर्णन तोकोविड नंतरच्या काळात दिवसेंदिवस मनोरुग्णांची संख्या वाढत चालली असून अशा या मनोरुग्णांना घरातील लोक आधार देत नाहीत. त्यांच्याजवळ जाण्यास कुटुंबातील लोक घाबरतात. अशा या रुग्णांवर योग्यप्रकारेचे औषध उपचार केले जात नाहीत. परिणामी असे हे मनोरुग्ण वाट मिळेल तिकडे चालत राहतात घरादारापासून हजारो किलोमीटर हे मनोरुग्ण भटकत राहतात. यांना आधार देण्याचे काम कोणीच करत नाही. पण सोलापूर शहरातील एक युवक अशा लोकांना आधार देण्याचे काम ध्येयवेडा तरुण अतिश लक्ष्मण शिरसट असून जागेअभावी त्याने स्मशानभुमीचा सहारा घेत मनोरुग्णांची सेवा करण्याचे काम सुरु ठेवले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट....असं करतो.किती काम केलं याचा तो कुठलाच हिशेब करीत किंवा ठेवत नाही, त्याच्यातला कार्यकर्ता जिवंत असल्याचं हे लक्षण आहे. विशेष म्हणजे त्याच्या या निस्वार्थ भावनेने केलेल्या धडपडीला, कामाला दाद देणारी माणसं आता पुढे येताना दिसत आहेत. समाजाच्या खिजगणतीतही नसलेल्या मनोरुग्णांसारख्या दु:खितांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण पेरण्याचे काम करणारी आतिश सारख्या माणसांची मात्र उणीव जाणवते..
मनोरुग्णांना ठेवण्यासाठी आतिशकडे निवाऱ्याची सोय नाही
मनोरुग्णांना ठेवण्यासाठी आतिशकडे असं कुठलही निवारा प्रकल्प नाहिय. त्याच कार्यालयही नाहीये. आतिशला जिथे मनोरुग्णाची माहिती मिळेल तिथे तो पोहोचतो ,जिथे त्याची गरज आहे तिथे तो असतो,
त्यासाठी आतिश म्हणतोय की माझ्यासोबत काही दिवस राहावं लागेल आणि अनुभव घ्यावे लागेल. खोटे प्रदर्शन,बडेजावपणा टाळून सामाजिक स्पर्धेपलीकडचं एक आगळेवेगळे विश्व आतिशने निर्माण केलंय. त्याचं काम हे त्याच्या जगण्याचा एक भाग आहे. असे तो मानतो. तो आजही आपल्याबरोबर कुठेही,रस्त्याच्या कडेला किंवा बस स्थानकात रेल्वे स्टेशनवर जिथे दिसेल तिथे तो मनोरुग्णांना सोबत वावरत असतो बोलत असतो. त्याच्या कामाला बळ देणारी जिवाभावाची माणसं त्याने जोडली आहेत. सामाजिक कामासाठी वेळ देऊ शकत नसली तरी समाजाबद्दल कळकळ असणारी व सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या दानशूर मंडळीने आतिशला मदत करण्यासाठी पुढे येणं खूप गरजेच आहे.
संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून मनोरुग्णांना केली जातेय मदत
रस्त्यावर व चौकात बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना पुन्हा समाजाच्याप्रवाहात आणण्याचं कार्य व त्यांचं पुनर्वसन करण्यासठी आयुष्य वेचणाऱ्या या ध्येयवेड्याने संभव फाउंडेशन नावाने संस्था स्थापन केली आहे. रस्त्यावरून जाता येता आपल्याला अनेक गोष्टी दिसतात लोकांची वर्दळ,भेसूर चेहरे,गोंधळ,भिक मागणारी लहान लेकरं....मात्र आतिशची नजर जाते ती रस्त्याच्या कडेला बसलेल्या भेसूर चेहरा व असहाय्य अवस्था असलेल्या मनोरुग्णांकडे आणि सुरुवात होते त्यांच्या पुनर्वसनाची.
पुनर्वसनाच्या कामाची सुरुवात करताना रुग्णांच निरिक्षण करून त्यांचे हावभाव जाणून घेणे,सवयींचे निरीक्षण करणे व त्यांच्याशी संवाद साधणे.त्यांच्या भुकेची,आरोग्याची चौकशी करणे. या कामात त्यांना बऱ्याचदा मनोरुग्णाच्या शिव्या खाण, मार बसण इत्यादी गोष्टींना सामोरे जावं लागत. या सर्व कामात त्यांच्या कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असतो.सुरुवातीला आतिशने काम सुरू केले तेव्हा घरी आल्यावर त्याला आंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश नसे.
मानसिक आजाराला विविध कारणे जबाबदार - मानसोपचार तज्ञ डॉ.हर्षल थरसडे
सध्याचे युग ताणतणावाचे असून व्यक्तीच्या बदललेल्या जीवन शैलीचा परिणाम ही त्याच्या जीवनावर झाला आहे. मानसिक आजार वाढण्यास अनेक कारणे असल्याचे मानसोपचार तज्ञ डॉ.हर्षल थरसडे सांगतात. वाढती बेरोजगारी,घरातील वातावरण,सतत एकटे राहणे,कामाचा ताण,आर्थिक तणाव अशी अनेक कारणे याला जबाबदार असल्याचे डॉक्टर सांगतात. चिडचिडेपणा,व्यक्ती स्वतःशीच बोलणे,पटकन रागाला जाणे,रात्रभर झोप न लागणे किंवा जास्त झोप लागणे यासारखी लक्षणे रुग्णात दिसू लागताच अशा व्यक्तीला पटकन मानसोपचार तज्ज्ञाकडे घेवून जावे. याबत लोकात अधिक जागरूकता होणे आवश्यक आहे. इतर आजारा प्रमाणे हेही आजार असतात. हे लोकांनी ध्यानात घेतले पाहिजे,असे डॉ. हर्षल थरसडे यांचे मत आहे.