#me too नंतर स्त्रियांच्या मदतीसाठी ‘We Together’

Update: 2018-10-17 09:03 GMT

देशभरातून आत्ता स्त्रियांना me too अंतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असून, देशभरात me too नंतर आत्ता स्त्रियांच्या मदतीसाठी पुण्यातील महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी एकत्रित येऊन एक आगळावेगळा उपक्रम सुरु केला आहे.लैंगिक अत्याचाराविरोधात स्त्रियांच्या मदतीसाठी या मुलांनी ‘We Together’ समितीची स्थापना केली आहे. या समिती सदस्य कल्याणी माणगावे यांनी आज पुण्यातील एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्याचबरोबर ही समिती ९ विद्यार्थ्यांची तयार केली आहे’ अशी महिती कल्याणी यांनी दिली. सर्वच स्त्रियांच्या मदतीसाठी आम्ही ‘We Together’ समितीची स्थापना केली आहे . त्याचबरोबर अश्या प्रकरणाबद्दल दाद कुठे मागायची यासंदर्भातील योग्य ते मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी सांगितले.

Similar News